गुजरातच्या कांडला बंदरावर रोखण्यात आलेले चिनी जहाज पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच पाकिस्तानच्या दिशेने प्रवास सुरु करणार होते. कराचीचे कासिम बंदर हे जहाजाचे अंतिम ठिकाण होते. नियमानुसार या जहाजाची कुठलीही थकबाकी बाकी नसल्याने या जहाजाला पुढच्या प्रवासासाठी कांडला बंदर यंत्रणेने आवश्यक परवानगी दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणि अचानक सूत्र फिरली…

जहाज बंदर सोडण्याच्या तयारीमध्ये असताना अचानक कांडला बंदरावर धावपळ वाढली. कांडला बंदरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीवरुन फोन आला. डीआरआय आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी बंदरावर दाखल झाले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अधिकारी या टीममध्ये होते.

या जहाजावर ऑटोक्लेव्ह नावाचा एक मोठा भाग आहे. त्यामुळेच या जहाजाला रोखण्यात आले. नागरी आणि लष्करी उद्देशाच्या पूर्ततेसाठी ऑटोक्लेव्हचा वापर होऊ शकतो. बॅलेस्टिक मिसाइलच्या लाँचिंगसाठी सुद्धा ऑटोक्लेव्ह वापरले जाते. सध्या डीआरडीओकडून या जहाजाची तपासणी सुरु आहे.

हाँगकॉँगवरुन भारतीय गुप्तचर यंत्रणांना नागरी आणि लष्करी पूर्ततेसाठी आवश्यक सामना जहाजावर असल्याची माहिती मिळाली आणि सर्व सुरक्षा यंत्रणा सर्तक झाल्या. इराणवर निर्बंध लादल्यानंतर अमेरिकन कंपन्यांचे चिनी जहाजांवर बारीक लक्ष आहे. जहाजाला बंदर सोडण्यापासून रोखल्यानंतर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सामानाची तपासणी केली, त्यावेळी जाहीर केलेले सामना आणि प्रत्यक्ष वस्तू वेगळी असल्याचे लक्षात आले. डीआरडीओच्या वेगवेळया टीम्सकडून अजूनही तपासणीचे कार्य सुरु आहे. डीआरडीओची मिसाइल शास्त्रज्ञांच्या दुसऱ्या टीमने या जहाजाची तपासणी केली आहे. पहिल्या टीमचा निष्कर्ष दुसऱ्या टीमने कायम ठेवला तर, कस्टम विभाग हे जहाज जप्त करेल व नियम भंग केल्याप्रकरणी जहाज कंपनीवर कारवाई करण्यात येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese ship detained in gujarat port nearly slipped away to pakistan dmp
First published on: 19-02-2020 at 11:28 IST