11 August 2020

News Flash

…तर स्वतंत्र सिक्किमच्या मागणीला चिथावणी देऊ!; चीनची पुन्हा धमकी

भूतानशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज

सिक्किम परिसरातील सीमेवरून भारत-चीन या दोन देशांतील संबंध ताणले गेले असतानाच चीननं पुन्हा एकदा भारताला धमकावलं आहे. भारतानं सीमावादातून माघार घेतली नाही तर भारतापासून सिक्किमला स्वतंत्र करण्याच्या मागणीला चिथावणी दिली जाईल, अशी धमकी चीननं दिली आहे.

चीनच्या सरकारी वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील संपादकीयमधून चीन सरकारनं भारताला धमकी दिली आहे. स्वतंत्र सिक्किमचं समर्थन करणं हेच भारताला धडा शिकवण्यासाठीचं महत्त्वाचं ‘कार्ड’ आहे. तेच अधिक प्रभावी ठरू शकतं, असं लेखात म्हटलं आहे. सिक्किम मुद्द्यावर चीन सरकारनं आपल्या भूमिकेवर पुन्हा विचार करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. सीमावाद निर्माण करणाऱ्या भारताला परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी धमकीच या लेखातून देण्यात आली आहे. या वादातून भारतानं माघार घेण्याची आवश्यकता आहे, असंही चिनी मीडियानं म्हटलं आहे. वृत्तपत्रातील संपादकीय लेखानुसार, चीननं २००३ मध्येच सिक्किमच्या भारतातील समावेशाला मान्यता दिली होती. पण आता या मुद्द्यावरील आपली भूमिका बदलली जाऊ शकते, असं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर, सिक्किममध्ये असेही काही लोक आहेत की आपण स्वतंत्र देशातील नागरिक असल्याचं मानतात, असं या लेखात नमूद करून स्वतंत्र सिक्किमच्या मुद्द्यात आणखी तेल ओतण्याचं काम केलं. भारतानं सिक्किमवर कब्जा करणं हे भयानक स्वप्न असून भूतानला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही त्यात म्हटलं आहे. भारतानं भूतानवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचे या सीमावादातून अधिक ठळकपणे स्पष्ट झाले आहे. भूतानच्या संरक्षणाचं कारण पुढे करून भारत चीनच्या क्षेत्रात तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही लेखातून करण्यात आला आहे. भूतानशी संबंध सुधारण्यासाठी चीनला आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचा सल्लाही या लेखात दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2017 1:21 pm

Web Title: chinese state daily beijing can make sikkim independent rewrite himalayan geopolitics
Next Stories
1 जोधपूरजवळ हवाई दलाचे मिग-२३ विमान कोसळले
2 अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी विहिंपकडून तीन ट्रक शिळा
3 शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुस्लिम कुटुंबानं स्वीकारला हिंदू धर्म
Just Now!
X