News Flash

“चायनिज लस करोनावर कमी प्रभावी”, चीननं दिली कबुली!

चायनिज व्हॅक्सिन करोनावर कमी प्रभावी असल्याची कबुली चीननंच दिली आहे.

फायझर आणि बायोएनटेक व्हॅक्सिन करोनावर प्रभावी नसल्याचा कांगावा करणाऱ्या चीनने अखेर चीनचीच व्हॅक्सिन करोनावर कमी प्रभावी असल्याची कबुली दिली आहे. द न्यूज मिनटनं दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे संचालक गाओ फू यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ही कबुली दिली आहे. “चायनिज व्हॅक्सिनमध्ये करोनापासून संरक्षण करण्यासाठीची फार जास्त क्षमता नाही. त्यासाठी आम्ही दोन किंवा अधिक व्हॅक्सिन एकत्र करून त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत आहोत”, असं देखील गाओ फू यांनी स्पष्ट केलं आहे. चीनकडून ब्राझील, तुर्की, हंगेरी, इंडोनेशिया, मेक्सिको अशा देशांना आत्तापर्यंत चायनिज व्हॅक्सिनचे लाखो डोस पुरवले आहेत.

“उत्सव, टाळी-थाळी खूप झालं आता देशाला लस द्या ; इव्हेंटबाजी कमी करा…”

चायनिज व्हॅक्सिन ५०.४ टक्के प्रभावी?

चीनमध्ये बनवण्यात आलेल्या सिनोवॅक व्हॅक्सिनची करोना व्हायरसपासून बचाव करण्याची क्षमता ब्राझीलमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनात ५०.४ टक्के इतकी आली आहे. जागतिक स्तरावरील संशोधकांच्या मते व्हॅक्सिन प्रभावी ठरण्यासाठी ती ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असायला हवी. त्याचवेळी फायझर-बायोएनटेक व्हॅक्सिनची बचावाची क्षमता तब्बल ९७ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. सध्या चीनमध्ये आणि चीनने व्हॅक्सिन निर्यात केलेल्या इतर देशांमध्ये सिनेवॅक आणि सिनोफार्म या कंपन्यांनी बनवलेल्या व्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला आहे.

दरम्यान, चायनिज लस बनवणाऱ्या सिनोवॅक कंपनीने मात्र हा दावा स्वीकारण्यास नकार दिला आहे. “व्हॅक्सिन प्रभावी ठरण्याची क्षमता कमी-जास्त होऊ शकते. पण हे अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांचं वय, संबंधित व्हायरसचा स्ट्रेन आणि इतर घटकांवर अवलंबून आहे”, अशी प्रतिक्रिया सिनोवॅकचे प्रवक्ते लियु पैचेंग यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, चीनने अजूनपर्यंत कोणत्याही इतर लसीला देशात लसीकरणाची परवानगी दिलेली नाही.

भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिनचं लसीकरण!

दरम्यान, भारतात Serum Institute ने उत्पादित केलेली covishield आणि Bharat Biotech ने तयार केलेली Covaxin या लसींचं लसीकरण सुरू आहे. यापैकी कोविशिल्ड ही लस Oxford आणि Astrazeneca यांनी संयुक्तपणे तयार केली असून तिचं उत्पादन पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटच्या प्लांटमध्ये केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 8:08 pm

Web Title: chinese vaccines effectiveness is low china agree compare to pfizer biontech pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 सुशील चंद्रा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
2 “निजामुद्दीन मरकजमध्ये प्रवेशावर निर्बंध घालता येणार नाहीत”, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले!
3 कुराणमधून आयाती वगळण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली; याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंड!
Just Now!
X