नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी शनिवारी सांगितले की, एअर इंडियामध्ये १०० टक्के निर्गुंतवणूक केली जाईल कारण आता निर्गुंतवणूक किंवा कंपनी बंद करणे या दोन्हीपैकी कुठलातरी एक पर्याय निवडण्याची वेळ आली आहे.

“आम्ही ठरविले आहे की एअर इंडियामध्ये १०० टक्के निर्गुंतवणूक केली जाईल. निर्गुंतवणूक करवी की करू नये आता हा पर्याय राहिलाच नाही तर निर्गुंतवणूक करणे किंवा एअर इंडिया बंद करण्याच्या हाच पर्याय आहे. एअर इंडिया ही प्रथम श्रेणीची मालमत्ता आहे परंतु त्यांवर साठे ६०,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. आम्हाला पाटी स्वच्छ करायची आहे, ”असे केंद्रीय मंत्रींनी एएनआयने सांगितले.

सरकारला आजतागायत मिळालेल्या लीलावांच्या बोलींबद्दल सांगताना पुरी पुढे म्हणाले, “सोमवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की एअर इंडिया निर्गुंतवणुकीसाठी शॉर्टलिस्टेड कंपन्यांना कळविण्यात आले की ६४ दिवसांच्या आत बोलीं लागल्या पाहिजेत. यावेळेस सरकारचा निर्णय पक्का आहे आणि यात कोणताही संकोच नाही.”

नवीन मालक एअर इंडियाच्या ताफ्यातील १२१ विमानांचा आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यातील २५ विमानांचा ताबा घेणार आहे. यात चार बोईंग ७४७-४०० जंबोजेट विमानांना वगळण्यात आले आहे. ही विमाने कंपनीने आपली सहाय्यक एलायन्स एअरकडे हस्तांतरित करण्याची योजना आखली आहे, जी सध्याच्या व्यवहाराचा भाग नाही. तथापि, शेवटच्या वेळे प्रमाणेच एअर इंडियाद्वारे सध्या वापरली जाणारी मालमत्ता, ज्यात नरिमन पॉईंट येथील इमारत आणि नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस जवळील कंपनीचे मुख्यालय यांचा समावेश आहे या दोनही मालमत्ता सरकार आपल्याजवळ ठेवणार आहे.