कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा मौलाना झाल्यानंतर आता दाउदचा खास हस्तक मानला जाणाऱ्या छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर निघाला आहे. बाप “गुन्हाओके देवता” तर मुले मात्र “अल्लाह के बंदे” असं परस्परविरोधी चित्र दिसत असल्याने आता दाउद आणि छोटा शकील नंतर त्यांची गादी कोण चालवणार? मुंबईच्या आणि विदेशातील बेकायदेशीर उद्योगांचा धनी कोण? असा प्रश्न दाउद आणि छोटा शकील यांच्यासमोर उभा राहिला आहे.

ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरला खंडणीच्या केसमध्ये अटक केल्यानंतर दाऊदचा मुलगा हा अध्यात्मिक शिक्षण घेऊन प्रचार आणि प्रसार करण्यासाठी इजेत्तमा मध्ये सहभागी झाला आहे. तो मौलवी झाल्याने काही दिवस दाउद हा नैराश्येत गेला होता. दरम्यान आता तीच पाळी छोटा शकीलवरही येऊन ठेपली आहे. त्याचा मुलगा हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणच्या पठणात अव्वल असून तोही अध्यात्माकडे वळला आहे. दाऊद आणि छोटा शकील हे मुंबई बॉम्बस्फोटांनंतर परांगदा झाले व पाकिस्तानच्या आश्रयाला गेले आणि तेथेच स्थायिक झाले आहेत. दाउद याच्या कुटुंबात अनेक मुले आहेत. मात्र अंडरवर्ल्ड सांभाळण्यासाठी एकही त्या पात्रतेचा नाही. तर छोटा शकील याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एकुलता एक असलेला मुलगा मोबाशीर शेख (वय 18) सध्या शिकत आहे. मात्र मोबाशीरने डॉन म्हणून कुख्यात असलेल्या वडिलांचा रक्तरंजित प्रवास खंडित करीत अध्यात्माची कास धरली असून मौलवी होणं स्वीकारलं आहे.

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

तर छोटा शकीलचा मुलगा हा कुराण पठणात अव्वल आहे. संपूर्ण कुराण त्याला तोंडपाठ असून गुन्हेगारी विश्वात त्याला रस नाही. छोटा शकीलला दोन मुली आहेत. त्या दोन्ही मुली झोया व अनाम  या विवाहित आहेत. दोघींचेही पती डॉक्टर असून ते कराचीत राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

छोटा शकील याचे आता वय झाले असून दाऊदप्रमाणेच त्यालाही पाकिस्तानच्या कराची शहरात बसून आपले साम्राज्य सांभाळावे लागत आहे. मात्र, आपला उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न दाउदसोबतच आता छोटा शकीललाही सतावत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील तरुण मुलं अध्यात्माची कास धरताना बघणं विचित्र वाटतं. कदाचित गुन्हेगारी विश्व बालवयापासून अत्यंत जवळून बघितल्यामुळेच त्या मार्गावर न जाता अल्लाहला शरण जाण्याचा निर्णय या दोघांनी घेतला असावा. आपण अध्यात्माची कास धरली तर कदाचित आपल्या कुटुंबाला जन्नतमध्ये स्थान मिळेल असंही त्यांना कदाचित वाटत असेल. ते काही असो, मात्र दाउद आणि छोटा शकील यांना भारतात भगोडे जरी म्हणण्यात येत असले तरी त्यांची मुले मात्र पाकिस्तानात उद्या मोठे प्रस्थ असलेले धर्मगुरू होतील अशी शक्यता दिसत आहे.