News Flash

‘या’ तारखेपासून उघडणार थिएटर्स, ममता बॅनर्जींचा निर्णय

चित्रपटगृहे सुरु करणारे पश्चिम बंगाल देशातील पहिलं राज्य

करोना महामारीमुळे पाच महिन्यापासून देशभरातील चित्रपटगृहे बंद आहेत. देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. करोनाच्या या संकाटामध्येही पश्चिम बंगालमध्ये एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे.

ट्विट करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “सामन्य परिस्थितीकडे जाताना, नाटक (प्ले), ओएटी, चित्रपटगृह, म्युझिकल व नृत्य कार्यक्रम आणि मॅजिक शोला एक ऑक्टोबर पासून परवानगी देण्यात येत आहे. पण या सर्व ठिकाणी ५० पेक्षा कमी जणांची उपस्थिती असायला हवी. यादरम्यान सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे (सामाजिक अंतर) पालन करायला हवं. शिवाय मास्क आणि इतर नियमांचेही पालन करावे.”

राज्य सरकारने बंगाली चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या लोक, TMC खासदार, नुसरत जहाँ, मिमी चक्रवर्ती आणि अन्य लोकांनी केलेल्या मागणीमुळे अखेर ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृह आणि इतर मनोरंजन कार्यक्रम बंद असल्यामुळे व्यावसायिक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे चित्रपटगृहे सुरु करावीत अशी मागणी केली होती. चित्रपटगृहे सुरु करण्याच्या निर्णयावर अनेक नेता अन् चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असणाऱ्यांनी ममता बॅनर्जी सरकारचे अभिनंदन केलं आहे.

करोना महामारीमुळे पाच महिन्यापासून देशभरातील चित्रपटगृहे बंद आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली आहे. अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र देशात चित्रपटगृहांना सुरु करण्याची अद्याप परवानगी देण्यात आली नाही. चित्रपटगृहे सुरु करणारे पश्चिम बंगाल देशातील पहिलं राज्य ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 9:31 am

Web Title: cinema halls to reopen in west bengal from october 1 mamata nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन
2 करोनापासून रक्षण करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा एक डोसही ठरु शकतो पुरेसा
3 भाजपा नेत्या उमा भारती करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X