News Flash

Covid 19: सिपला औषध कंपनीचं आरटी-पीसीआर टेस्ट किट आजपासून विक्रीला

'ViraGen'च्या माध्यमातून करोना चाचणी

राज्यात आज रोजी एकूण ९३,४७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत..(संग्रहीत छायाचित्र)

देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. करोना बाधा टाळण्यापासून ते करोना झाल्यानंतर उपचार करेपर्यंत सर्वच स्तरावर उपाययोजना केल्या जात आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील सर्वच राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र करोन झाला की नाही याबाबत कित्येकांना माहिती नसतं. मात्र त्यांच्या माध्यमातून करोनाचा फैलाव होत असतो. यासाठी रॅपिड अँटिजेन आणि अँटिबॉडी चाचणी केली जात आहे. आता सिपला औषध कंपनीने करोनाची चाचणी करण्यासाठी ‘ViraGen’ हे आरटी-पीसीआर किट बाजारात विक्रीसाठी आणलं आहे. आजपासून हे किट उपलब्ध असणार आहे. या किटला आयसीएमआरकडून मान्यता मिळाली आहे.

सिपलाने गेल्या आठवड्यात या किटबाबत माहिती दिली होती. करोनाची चाचणी करण्यासाठी सिपला कंपनीचं हे तिसरं प्रोडक्ट आहे. यापूर्वी अँटिजेन टेस्टिंग किट आणि अँटीबॉडी टेस्टिंग किट बाजारात आणलं आहे. ‘ViraGen’ या किटमुळे करोनाबाबतचं माहिती मिळणार आहे.

दिलासादायक! महिन्याभरानंतर रुग्णसंख्या २ लाखांच्या खाली

‘या किटमुळे लोकांना चाचणी करण्यासाठी येणारी अडचण दूर होणार आहे. तसेच आयसीएमआरच्या स्टँडर्ड ९८.८ टक्क्यांच्या तुलनेत ९८.६ टक्के करोना विषाणूबाबत माहिती देण्यास मदत होत आहे. ही चाचणी मल्टीप्लेक्स पीसीआर तंत्रज्ञानावर आधारित आहे. करोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांच्या श्वसनमार्गाच्या वरच्या आणि खालच्या भागातील न्यूक्लिक अ‍ॅसिड शोधण्यासाठी हे किट तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे रुग्णांना करोनाबाबत माहिती मिळणार आहे’, अंस कंपनीने टेस्टिंग किट लॉन्च केल्यानंतर सांगितलं होतं.

“मोदींचा हिंदुत्ववाद, विज्ञानासंदर्भातील अनास्थेमुळे करोनाविरुद्धची देशाची लढाई आणखीन कठीण झाली”

करोना रोखण्याच्या लढाईत आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. त्यामुळे करोना फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. तसेच करोना झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार घेता येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 12:35 pm

Web Title: cipla corona rt pcr test kit viragen available in market from today rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “लक्षद्वीपचा दुसरा काश्मीर तयार करताय का?,” गोमांस बंदीसहित अनेक निर्णयांमुळे वाद
2 “मोदींचा हिंदुत्ववाद, विज्ञानासंदर्भातील अनास्थेमुळे करोनाविरुद्धची देशाची लढाई आणखीन कठीण झाली”
3 गुजरातमधील कोचिंग सेंटरमध्ये धाड टाकली असता समोर आलं धक्कादायक चित्र; पोलीसही संतापले
Just Now!
X