काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएससीई) या मंडळाचा दहावीचा आणि बारावीचा (आयएससी) निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परिक्षेत ९९.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर बारावीच्या परीक्षेचा निकाल ९६.८४ टक्के लागला आहे. विद्यार्थी आयोगाच्या http://www.cisce.org या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. महत्त्वाचं म्हणजे सीआयएससीईने मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मुलगी बारावीत आयएससी बोर्डाच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेऊन पास झाली आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

अखिलेश यादव यांनी ट्विट करत मुलगी आदिती यादव हिचं अभिनंदन केलं आहे. तसेच तिचा अभिमान असल्याचेही म्हटले आहे. पत्नी आणि मुलीसोबतचा खास फोटो अखिलेश यादव यांनी शेअर केला आहे. शिवाय, पास झालेल्या सर्वांचं अखिलेश यांदव यांनी अभिनंदन केलं आहे.


एकूण २ लाख ७ हजार ९०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील २ लाख ६ हजार ५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ५४.१९ टक्के असून ४५.८१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षेत ८८ हजार ४०९ विद्यार्थ्यांपैकी ८५हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल कसा पहायचा –
१) cisce.org किंवा results.cisce.org. या वेबसाइटवर जा
२) होमपेजवर ICSE result 2020 किंवा ISC result 2020 निवडा
३) तिथे तुमचा युआयडी क्रमांक, इंडेक्स क्रमांक तसंच तर विचारण्यात आलेली माहिती भरा
४) Submit किंवा Show Result वर क्लिक करा
५) यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
६) तुमच्या निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा.

SMS च्या माध्यमातूनही माहिती घेऊ शकता –
१) मेसेज बॉक्स उघडा आणि खाली दिलं आहे त्याप्रमाणे टाइप करा
२) ICSE (स्पेस) युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा
२) ISC >युनिक आयडी क्रमांक आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा