भारत आणि चीनमध्ये परस्पर संबंध सुधारावेत आणि त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध दृढ व्हावेत यासाठी दोन्ही देशांच्या नागरिकांनी परस्परांच्या भाषा अर्थात हिंदी आणि मँडरिन शिकावी असे आवाहन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. चीनच्या पेईचिंग येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये त्या बोलत होत्या.


‘भारत आणि चीनच्या मैत्रीमध्ये हिंदीचे योगदान’ या विषयावर माध्यामांना त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी संवादातील अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देशांच्या भाषा समजून घेण्याच्या महत्वावर भर दिला.

स्वराज म्हणाल्या, ज्या प्रकारे आज दोन्ही देशांतील संबंध मजबूत होत आहेत. यामध्ये चिनी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा शिकायला हवी तसेच भारतीय विद्यार्थ्यांनी मँडरिन भाषा शिकणे महत्वाचे आहे. दोन्ही देशांचे विदेश मंत्रीही परस्पर संबंध सुधारण्यात जितके महत्वपूर्ण काम करू शकत नाहीत. तितके महत्वाचे काम हे विद्यार्थी करु शकतात. यावेळी स्वराज यांनी भारतीय चित्रपटांच्या चीनमध्ये वाढत्या लोकप्रियतेबाबत कौतुकही केले.

सुषमा म्हणाल्या, भारतीय चित्रपट वेगाने चीनमध्ये प्रसिद्ध होत आहेत. काल परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा करताना त्यांनी दंगल, सिक्रेट सुपरस्टार आणि हिंदी मिडीयम हे सिनेमे चीनमध्ये हीट झाल्याचे सांगितले. दरम्यान, जे चिनी विद्यार्थी हिंदी भाषा शिकत आहेत. त्या २५ विद्यार्थ्यांना लवकरच भारत दौऱ्यावर येतील असे आश्वासन त्यांनी दिले.

स्वराज म्हणाल्या, एका मुलीने सांगितले की, तिचे भारतात येण्याचे स्वप्न आहे मात्र, तिचे हे स्वप्न कधी पूर्ण होईल हे तिला माहिती नाही. मात्र, मी सांगू इच्छेते की या मुलीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. मी भारतीय राजदूतांना सांगितले की, इथे बसलेल्या २५ विद्यार्थ्यांना हिंदी शिकण्याची इच्छा आहे त्यांना भारतात पाठवा.