हिवाळ्याच्या आगामी हंगामात (डिसेंबर ते फेब्रुवारी) उत्तर, उत्तर-पश्चिम व मध्य भारताच्या बहुतांश उपविभागांमध्ये तसेच पूर्व भारतामधील काही विभागांमध्ये किमान तापमान सामान्य कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना फेब्रुवारीपर्यंत गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील बहुतांश भागांमध्ये डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांमध्ये किमान तापमान हे सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर भागांमध्ये व दक्षिण भारतातील बहुतांश उपविभागांमध्ये किमान तापमान हे सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

तसेच, पूर्वोत्तरच्या काही भागांमध्ये व उत्तर भारतातील बहुतांश ठिकाणांवर कमाल तपामान हे सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य भारताच्या काही उपविभागांमध्ये व दक्षिण भारताच्या काही कमला तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाकडून दरवर्षी उन्हाळा व हिवाळ्याच्या हंगामासाठी पुर्वानुमान जाहीर केले जाते. मागील तीन महिन्यांमध्ये भारतामधील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान हे सामन्यपेक्षा अधिक राहिले आहे. तर, उत्तर उपविभागांमध्ये किमान तापमान हे सामन्य तापमानापेक्षा कमी राहिलेले आहे.

याशिवाय पूर्वोत्तर भारतमधील काही राज्यांमध्ये उत्तर भारत, मध्य भारताच्या काही भागांमध्ये कमाल तापमान हे सामान्यपेक्षा अधिक राहिलेले आहे.