News Flash

ऑपरेशन थिएटरमध्येच सर्जनने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे

(संग्रहित छायाचित्र)

एका सिव्हिल सर्जनचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या व्हिडिओत हा सिव्हिल सर्जन हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एका महिलेचे चुंबन घेताना दिसतो आहे. ही महिला नर्स असल्याचे सांगण्यात येते आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघेहीजण एकमेकांच्या मिठीत आहेत आणि किसिंग करत आहेत असे दिसते आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन या ठिकाणी एका रुग्णालयात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी सिव्हिल सर्जनची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना दिली. व्हायरल झालेल्या क्लिपवर तारीख नाही त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे सांगता येणार नाही. मात्र या व्हिडिओमध्ये हा सर्जन एका महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये किस करताना स्पष्टपणे दिसतो आहे. या सिव्हिल सर्जनच्या जागी डॉ. पी. एन. वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 1:57 pm

Web Title: civil surgeon kisses woman in operation theatre removed from post
Next Stories
1 कुंभमेळा २०१९: प्रयागराज येथे दिगंबर आखाड्यात भीषण आग, डझनभर तंबू जळून खाक
2 Amazonमध्ये बंपर नोकरभरती, 1300 जागांसाठी व्हेकेन्सी
3 ‘राम मंदिर न बांधल्यास भाजपाला जनतेची मतं नव्हे तर रोष पदरी पडेल’
Just Now!
X