23 July 2019

News Flash

जम्मू काश्मीर – दहशतवाद्यांकडून अपहरण करुन सामान्य नागरिकाची हत्या

अहमद यांना दहशतवाद्यांनी जबरदस्ती घरातून नेलं आणि गोळ्या घालून हत्या केली

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करुन एका नागरिकाची हत्या केली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे ही हत्या करण्यात आली. मनजूर अहमद असं हत्या करण्यात आलेल्या नागरिकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय अहमद यांना दहशतवाद्यांनी जबरदस्ती घरातून नेलं आणि गोळ्या घालून हत्या केली.

पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘गुरुवारी रात्री एका व्यक्तीची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. मनजूर अहमद अशी त्यांची ओळख पटली आहे. प्राथमिक तपासात जबरदस्ती त्यांना घरातून बाहेर नेत गोळ्या घालून ठार केलं असल्याचं समोर आलं आहे’. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांत सामान्य नागरिकावर हल्ला होण्याची ही तिसरी वेळ आहे.

उच्च माध्यमिक शाळेजवळ मनजूर यांचा मृतदेह सापडला. मनजूर अहमद यांचा जागीच मृत्यू झाला होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेनंतर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

First Published on March 15, 2019 9:51 am

Web Title: civilian killed by terrorists in jammu kashmir