News Flash

समलैंगिक वकिलाची हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून शिफारस; सरन्यायाधीशांनी केंद्राला पत्र लिहून मागवली माहिती

२०१७ मध्ये पदोन्नतीसाठी सौरभ किरपाल यांच्या नावाची शिफारस केली गेली होती

प्रातिनिधिक

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सौरभ किरपाल यांच्या पदोन्नतीबाबतच्या केंद्राच्या भूमिकेबद्दल सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. या प्रकाराबाबतची अधिक माहिती मागवली आहे. २०१७ मध्ये पदोन्नतीसाठी सौरभ किरपाल यांच्या नावाची शिफारस केली गेली होती.

केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी सौरभ किरपाल यांबाबत अतिरिक्त माहिती मागितली आहे जेणेकरून त्यांच्या बढतीबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र ही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉले़जियमची केंद्राकडे केलेली अधिकृत शिफारस नसल्याचे या सूत्रांनी सांगितले आहे.

२ मार्च रोजी झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉले़जियमने या संदर्भात मुद्दाम विचार केला होता परंतु केंद्राकडून अधिक माहिती प्राप्त होईपर्यंत आपला निर्णय त्यांनी पुढे ढकलला.

ऑक्टोबर २०१७ मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या कॉले़जियमने सर्वानुमते त्यांच्या नावाची शिफारस केली होती. तेव्हापासून सौरभ किरपाल यांच्या बढतीबाबतचा हा निर्णय चौथ्यांदा स्थगित करण्यात आला आहे.

दिल्ली हायकोर्टाच्या कॉले़जियमच्या सूचनेनंतर गुप्तचर यंत्रणांनी सौरभ किरपाल यांच्या उन्नतीच्या निर्णयावर स्थगिती आणली होती आणि असे म्हटले होते की त्यांचा साथीदार, जो एक परदेशी नागरिक आहे त्यामुळे तो “सुरक्षेला धोका” ठरू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 11:02 am

Web Title: cji s a bobde writes to centre seeking more info on elevation of gay lawyer as hc judge sbi 84
Next Stories
1 उलटी आल्याने मुलीने डोकं बसच्या खिडकीतून बाहेर काढलं आणि तितक्यात समोरुन वेगाने ट्रक आला अन्..
2 YouTube वर रेसिपी चॅनेल सुरु केल्याने गँगस्टर लागला पोलिसांच्या हाती; सात वर्षांपासून होता फरार
3 अरररर घोळ झाला! भाजपाच्या प्रचार व्हिडीओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप
Just Now!
X