News Flash

“तारीख पे तारीख” ओरडत दिल्लीतील कोर्टात आदळआपट; दामिनीतल्या सनी देओलच्या डायलॉगची पुनरावृत्ती

चित्रपटात होणारा प्रकार दिल्लीत एका न्यायालयात खराखुरा पाहायला मिळाला

हा प्रकार करकरदूमा न्यायालयात घडला (photo indian express)

चित्रपटात होणारा प्रकार दिल्लीत एका न्यायालयात खराखुरा पाहायला मिळाला. न्ययालयात केसचा निकाल लागण्यास दिरंगाई होत असल्याने त्रस्त व्यक्तीच्या अंगात थेट सनी देओल अवतरला. हा प्रकार करकरदूमा न्यायालयात घडला. एका व्यक्तीने प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा “तारीख पे तारीख” डायलॉग मारत न्यायालयात तोडफोड केली. त्यामुळे करकरदूमा न्यायालयात एकचं खळबळ उडाली. खरं तर, राकेश आपल्या प्रकरणाची लवकर सुनावणी होत नसल्यामुळे रागावला होता. दरम्यान, त्याने न्यायालयात ठेवलेले कम्प्यूटर व इतर वस्तू तोडल्या. त्यामुळे त्याची थेट तुरूंगात रवानगी झाली.

ही घटना १७ जुलै रोजी कोर्ट क्रमांक ६६ येथे घडली. २०१६ पासून प्रकरण न्यायालयात प्रलंबित असलेल्यामुळे शास्त्रीनगरातील रहिवासी राकेश त्रस्त होता. त्यामुळे त्याने हिंदी चित्रपटातील डायलॉग ‘तारीख पे तारीख’ ची घोषणाबाजी करत न्यायालयात तोडफोड केली. गेले अनेक वर्ष खटल्याची सुनावणी होत नाही आणि मला फक्त तारीख मिळत असल्यामुळे आपण त्रस्त असल्याचे राकेशने पोलिसांना सांगितले.

हेही वाचा- …अन् चक्क त्याने जेसीबी थांबवून लहान मुलांच्या खेळण्यात माती ओतली; व्हिडीओ व्हायरल

राकेशने कोर्टाच्या आत न्यायाधीशांचा मंच देखील तोडला. त्याचा हा प्रकार पाहून कर्मचार्‍यांनी गजर वाजवला. त्यानंतर  पोलिसांनी राकेशला अटक केली. राकेशने न्यायालयात मारलेला डायलॉग ‘तारिख पे तारिख’ हिंदी चित्रपट ‘दामिनी’ मधील आहे. अ‍ॅडव्होकेटची भूमिका साकारलेल्या सनी देओलने हा डायलॉग मारला होता.

आरोपी राकेशला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राकेशवर कलम १८६, ३५३ आणि ७२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तलेच कलम ५०६ (फौजदारी धमकी) देखील दाखल करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:17 pm

Web Title: clash delhi court shouting tarikh pe tarikh repeat of sunny deol dialogue in damini srk 94
Next Stories
1 भारतीयांनो, राज कुंद्रावर टीका करण्याआधी Porn संदर्भातील ‘हा’ डेटा एकदा बघाच
2 वाढदिवस विशेष Video : फडणवीस अन् पवार… कट्टर प्रतिस्पर्धींचा वाढदिवस मात्र एकाच दिवशी
3 चीनच्या पुरातही मार्ग काढत चालतेय टेस्ला गाडी; व्हिडीओ व्हायरल