13 December 2018

News Flash

बारावीच्या परिक्षेचे हॉल तिकिट फाडले म्हणून विद्यार्थीनीने केली आत्महत्या

वर्गातील दोन मुलांनी तिचे हॉल तिकिट फाडले.

वर्गातील मुलांनी बोर्डाच्या परिक्षेचे हॉल तिकिट फाडले म्हणून एका दलित विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तामिलरसी (१७) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती १२ व्या इयत्तेत शिकत होती. तामिळनाडूच्या कृष्णागिरीमध्ये सोमवारी ही दुर्देवी घटना घडली. तामिलरसी परिक्षा देण्यासाठी शाळेमध्ये गेलेली असताना वर्गातील दोन मुलांनी तिचे हॉल तिकिट फाडून टाकले.

आपले वर्ष वाया गेले म्हणून निराश झालेल्या या विद्यार्थीनीने घरी गेल्यानंतर गळफास घेऊन जीवन संपवले. मंगळवारी देवीराहाल्ली गावातील घरात तामिलरसीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. शेजाऱ्यांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. ज्या दोन मुलांनी तामिलरसीचे हॉल तिकिट फाडले त्यातील एक मुलगा तिला आधीपासून त्रास देत होता.

मुलीच्या कुटुंबियांनी त्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोन मुलांपैकी एकाने तामिलरसीला प्रपोज केला होता. नकार दिला तर चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची तिला धमकी दिली होती असे एका कुटुंबियाने सांगितले. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

First Published on March 14, 2018 3:35 pm

Web Title: classmates tore hall ticket girl suicide