News Flash

पॅरिसचे हवाभान, फ्रेंच जीवनभाष्ये..

से न नदीच्या काठावर वसलेली पॅरिसनगरी म्हणजे दोन हजार वर्षांचा चालताबोलता इतिहास आहे.

से न नदीच्या काठावर वसलेली पॅरिसनगरी म्हणजे दोन हजार वर्षांचा चालताबोलता इतिहास आहे. फ्रेंच राज्यक्रांती (१७८९), महायुद्ध (१९४१), तरुणांचे बंड (१९६८) यांची साक्षीदार पॅरिसनगरी १४ नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यातून सावरून हवामान बदलाच्या शिखर परिषदेमध्ये सक्रिय सहभागी झाली आहे. विचारी आणि संयमी ह्य़ा ऐतिहासिक प्रतिमेला अधोरेखित करणारं फ्रान्सच्या जनतेचं वर्तन आहे.

जगात कुणालाही विचारमग्नता, एकांतवास, सर्जनशीलतेचा उगम अभिव्यक्त करताना ऑगस्ट रोदँ यांनी निर्माण (पान १० वर)

(पान १ वरून) केलेल्या ‘द िथकर’ (१८८८) या शिल्पाची आठवण होतेच. तत्त्वज्ञ, लेखक, दिग्दर्शक, कलावंत व बुद्धिवंतांना राष्ट्राचा ठेवा मानणाऱ्या फ्रान्सचं ‘द िथकर’ हे प्रतीक आहे. पॅरिसमधील प्रत्येक संग्रहालय चित्र, शिल्प व वस्तू यांना अतिशय आस्थेने कसं जतन करावं, याचा आदर्श आहे. विचारवंतांचा सल्ला घेण्याची प्रथा फ्रेंच जनता आणि नेते दोघांनीही जपली आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर विचारवंतांना अधिक वेळ दिला जातो. ‘लमाँद (जनता)’ या अग्रगण्य फ्रेंच दैनिकात विचारवंतांच्या स्तंभ व लेखांना विशेष स्थान दिलं जातं. २००८ च्या मंदीनंतर फ्रान्सचे अध्यक्ष निकॉलस सार्कोझी यांनी प्रो. अमर्त्यसेन व प्रो. जोसेफ स्टिगलिट्झ यांना पाचारण करून ‘आíथक कामगिरीचे मापन अणि सामाजिक प्रगती’ या संशोधनाला चालना दिली. अर्थवेत्त्यांशी सल्लामसलत करून अर्थसंकल्प करण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. २०११ साली लिबियामधील बंडाळी व अस्थिरता पाहून तत्त्वज्ञ बर्नाड हेन्री लेव्ही (बीएचएल या आद्याक्षरांनी प्रसिद्ध) यांनी सार्कोझी यांना हस्तक्षेप करण्याचा सल्ला दिला होता. आजही फ्रान्सच्या सार्वजनिक जीवनात राजकीय नेते व अभिनेते यांच्यापेक्षा विचारवंतांना मानाचं (व अभिमानाचं) स्थान आहे. बर्नाड हेन्रीलेव्ही हे कमालीचे लोकप्रिय आहेत. आज जागतिक पातळीवर स्थान असणारं ज्याँ पॉलसात्र्, आल्बेरकामू, मायकेल फुकोवाजेक्सदेरिदा यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व फ्रान्समध्ये नाही, याची खंत त्यांना जरूर असते. तरीही ‘आमच्याकडे पिकेटी आहेत,’ असंही ते आवर्जून सांगतील. नुकतेच मुंबईत येऊन गेलेल्या प्रो. थॉमस पिकेटी यांच्या ‘कॅपिटल इन द ट्वेंटिफर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकामुळे जगभर विषमतेच्या समस्येची सघन चर्चा सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांत या पुस्तकाच्या १५ लक्ष प्रतींची विक्री झाली असून अनेक भाषांमधून अनुवाद झाले आहेत. विषमतेविषयक पुस्तकांची विभागणी ‘बीसी (बिफोर ख्राइस्टनव्हे तर ‘कॅपिटलइन द ट्वेंटिफर्स्ट सेंच्युरी’) आणि ‘एपी आफ्टरपिकेटी) ‘द इकॉनॉमिस्ट’नं या पुस्तकाची महत्ता अशी व्यक्त केली आहे.
पॅरिसमधील पुस्तकांच्या दुकानात ‘फ्रेंच कॅट्स आर मोअर सुपिरिअर टू यू ’, ‘फ्रेंच चिल्ड्रन डोन्ट थ्रो’, ‘हाऊ द फ्रेंच िथक’ अशी गमतीदार शीर्षके आढळतात. ‘अशी पुस्तके फक्त फ्रान्समध्येच लिहिली व वाचली जातात.’ असं ते नमूद करतात. अशा सर्व पुस्तकांना प्रचंड मागणी असते.
संपूर्ण पॅरिस विशेषत: ल बोर्जेला पोलीस व सन्याचा गराडा असल्यामुळे लष्कर छावणीचं स्वरूप आलं आहे. प्रत्येकाचे व्यवहार कुणालही त्रास न देता शांतपणे चालू आहेत. परिषदेत पोहोचण्यासाठी वायू प्रदूषण न करणाऱ्या बसेस व मोटारी आहेत. सगळेजण पाहुण्यांना सहकार्य करायला तयार असतात.
अभिमान आहे परंतु उरबडवेगिरी नाही. अस्मिता आहे, पण आततायी वा आक्रस्ताळं प्रदर्शन नाही. हेच फ्रान्सचं वैशिष्टय़ आहे. ‘स्वातंत्र्य, समता व बंधुता’ या मूल्यांमधील स्वातंत्र्यच तरुण पिढीच्या फक्त लक्षात राहिलं असून नंतरच्या दोन्हींचा विसर पडला आहे, अशी टीका बुजुर्ग फ्रेंच करतात. असं असलं तरीही आपल्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यास बाधा येणार नाही, याची खबरदारी प्रत्येक फ्रेंच व्यक्ती घेत असते. शहरीकरणानंतर आलेले सार्वजनिक नियम हे आपल्यासाठीच आहेत असं मानून फ्रान्समध्ये त्यांचं मनोमन पालन केलं जातं. पोलीस नसला तरी ते सिग्नलला थांबतात. कुठेही कस्पटसुद्धा टाकत नाहीत. धर्म वा वर्णद्वेषी वक्तव्य ऐकू येणार नाही. अतिरेकी हल्ल्याची जखम हृदयात असली तरीही हवामान बदलाच्या आणीबाणीसाठी जागतिक सहकार्य आवश्यक आहे, याचं भान सर्वाच्या बोलण्यातून जाणवतं. एकाही वाहिनीने वा पत्रकाराने चुकूनही त्यांच्या मर्यादांचं उल्लंघन केलं नाही. प्रेत, रक्त, आक्रंदन, नेत्यांच्या इस्पितळांना भेटी अजिबात दिसलं नाही. प्रत्येक नागरिक शांतपणे भावना व्यक्त करून आपापली कामं चोख पार पाडतात. आधुनिकतेची मूल्ये फ्रान्समध्ये खोलवर रुजल्याच्या सर्व खुणा आढळतात. मुरलेली आधुनिकता व कलासक्तता यातूनच फ्रेंच सार्वजनिक जीवन व्यक्त होत असतं. आपल्याकडे आधुनिक सरंजामीची मुळं खोलवर पसरली असल्याने आपण तुलना तरी कशी करणार?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 3:34 am

Web Title: climate change summit in paris
Next Stories
1 सर्वसमावेशक व संपन्नतेचे आंबेडकरांचे स्वप्न साकारू
2 गोमांस महोत्सव रोखण्यासाठी हैदराबाद पोलीस सज्ज
3 भारत-पाक सुरक्षा सल्लागारांची चर्चा
Just Now!
X