रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्ती सहकारी मिखाईल लेसिन यांचा गुरुवारी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील डय़ूपाँ सर्कल हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला.

लेसिन १९९९ ते २००४ या काळात रशियाचे प्रसारमाध्यम मंत्री होते तर २००४ ते २००९ दरम्यान पुतीन यांचे माध्यम सल्लागार होते. रशिया टुडे या सरकारी वृत्तवाहिनीच्या निर्मितीमागे त्यांचीच प्रेरणा होती. पुतीन यांच्या प्रतिमानिर्मितीत त्यांचाच हात होता.