02 December 2020

News Flash

हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

लँडिंगच्यावेळी घडली घटना...

रविशंकर प्रसाद

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आज एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. या दरम्यान पाटणा एअरपोर्टवर त्यांचे हेलिकॉप्टर तारेला धडकले. ज्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेच्यावेळी मंगल पांडेय आणि संजय झा त्यांच्यासोबत होते.

पाटणा एअरपोर्टजवळ बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला हेलिकॉप्टरचे पंखा लागला.त्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेत रविशंकर प्रसाद सुदैवाने बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आज संध्याकाळी ही घटना घडली. रविशंकर प्रसाद निवडणूक प्रचार संपवून पाटण्याला परतले होते. हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्यावेळी पंखा तारेला धडकला. हेलिकॉप्टरचे दोन ते तीन ब्लेड तुटले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि बिहारचे जल सिंचन मंत्री संजय झा उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 8:37 pm

Web Title: close shave for union minister ravi shankar prasad after chopper blades break at patna airport dmp 82
Next Stories
1 भारतात रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ च्या चाचणीचा मार्ग मोकळा
2 पंजाब : २०० दहशतवाद्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडणाऱ्या बलविंदर सिंग यांची गोळ्या घालून हत्या
3 NEET 2020 : पैकीच्यापैकी गुण मिळवूनही दिल्लीची आकांक्षा पहिल्या रँकपासून दूर; जाणून घ्या काय आहे नियम?
Just Now!
X