News Flash

पंधरा दिवसांत बंगले खाली करा; युपी सरकारच्या माजी मुख्यमंत्र्यांना नोटिसा

उत्तर प्रदेशातील ज्या ६ माजी मुख्यमंत्र्यांनी आद्यापही सरकारी बंगले सोडलेले नाहीत. त्यांना सुप्रीम कोर्टाने नुकतेच फटकारले होते. यापार्श्वभूमीवर युपी सरकारने त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या

योगी आदित्यनाथ (संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील ज्या ६ माजी मुख्यमंत्र्यांनी आद्यापही सरकारी बंगले सोडलेले नाहीत. त्यांना सुप्रीम कोर्टाने नुकतेच फटकारले होते. यापार्श्वभूमीवर युपी सरकारने त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या नोटिसनुसार, यासाठी त्यांना पुढील १५ दिवसांत अवधी देण्यात आला आहे.


मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अद्यापही सरकारी निवासस्थानात आपले ठाण मांडून बसलेल्यांमघ्ये मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव, मायावती, एन.डी.तिवारी, कल्याण सिंह आणि राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. सरकारी निवासासाठी या लोकांना नाममात्र भाडे अदा करावे लागते. यावरच सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, पदावरून दूर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले दिले जाणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्याकडून बंगले खाली करवून घ्यावेत अशा स्पष्ट सुचना कोर्टाने राज्य सरकारांना दिल्या आहेत.

दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांचा बंगल्यातील मुक्काम कायम राहण्यासाठी दुसरा पर्याय काढण्याची विनंती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 5:09 am

Web Title: cm adityanath government issued notices to six former chief ministers to vacate official bungalows
Next Stories
1 न्यायालयात बहुमत सिद्ध करण्यास भाजपचा विरोध
2 महात्मा गांधींच्या ‘त्या अपमानाला’ १२५ वर्षे पूर्ण
3 इथिओपियाच्या सिमेंट कंपनीतील भारतीय अधिकाऱ्याची हत्या
Just Now!
X