News Flash

कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग; भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री येडीयुरप्पा म्हणाले…

कर्नाटक भाजपात गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी दिल्लीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. (फोटो-ANI)

कर्नाटक भाजपात गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. येडीयुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीमुळे कर्नाटकमधील नेतृत्व बदलाच्या घडामोडींना वेग आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या सर्व चर्चा खोडून काढल्या आहेत.

“आम्ही कर्नाटकमध्ये भाजपा पक्षाच्या वाढीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांचं माझ्याबद्दल चांगलं मत आहे. राज्यात पुन्हा पक्षाची सत्ता येण्याासाठी मी काम करेन.”, असं मुख्यमंत्री बीएस युडीयुरप्पा यांनी सांगितलं.

“मला पक्ष नेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं. तर मी तात्काळ राजीनामा देईन. पण मला वाटतं कर्नाटक भाजपात दुसरा पर्याय नाही. जिथपर्यंत दिल्लीतील नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे. तिथपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर राहणार. ज्या दिवशी सांगतील राजीनामा दे, त्या दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र काम करेन” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे कर्नाटकमधील प्रभावशाली नेते आहेत आणि लिंगायत समुदायातून येतात. २०१२ मध्ये येडीयुरप्पा यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हा त्यांनी वेगळी केजीपी पार्टी स्थापन केली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ९.८ टक्के मतं मिळाली होती. ६ जागांवर केजेपीचे उमेदवार जिंकले होते. तेव्हा भाजपाला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.

पंजाबमधील काँग्रेसमधील वाद संपला!; मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार म्हणाले…!

२०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ११० जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताचा आकडा पक्ष गाठू शकला नव्हता. त्यासाठी त्यांनी ६ अपक्ष आमदारांना गळ घातली होती. मात्र त्यांच्या जीवावर सरकार फार काळ टिकू शकणार नाही याचा अंदाज आल्याने जेडीएस आणि काँग्रेसकडे मोर्चा वळवला होता. याला ‘ऑपरेशन कमळ’ असं नाव देण्यात आलं होतं. सात आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यापैकी ५ जण निवडूनही आले होते. कर्नाटकमध्ये भाजपाने २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीयूचं सरकार पाडलं. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 5:57 pm

Web Title: cm bs yediyurappa meet bjp leader jp nadda and discussion about karnataka rmt 84
Next Stories
1 “उत्तर प्रदेश आता मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही”
2 “ओवैसींच्या मदतीने योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन”
3 “दिल्लीच्या या भागात मुख्यमंत्र्यांच्या जाहीराती नाही, तर आमच्या…”; गौतम गंभीर यांचा केजरीवाल यांना टोला
Just Now!
X