News Flash

मी कधी मित्र धर्म सोडला नाही पण…चंद्राबाबू नायडूंचा भाजपाला इशारा

त्यांनी माझे ऐकले नाही तर मी नमस्कार करून माझ्या मार्गाने जाईल

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) दोन सदस्य पक्ष भाजपा आणि तेलुगू देशम पक्षात (टीडीपी) गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आता आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाबरोबर असलेली युती तोडण्याची त्यांनी धमकी दिली आहे. मी कधी मित्र धर्म सोडलेला नाही..जर त्यांनी माझे ऐकले नाही तर मी नमस्कार करून माझ्या मार्गाने जाईल, अशा शब्दांत चंद्राबाबूंनी भाजपाला इशारा दिला. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केल्याने ते नाराज आहेत. दरम्यान, टीडीपीच्या नाराजामुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पानंतर आंध्र प्रदेशसाठी वाढीव निधी मंजूर केला होता. पण त्यावर टीडीपी समाधानी नसल्याचे दिसते.

केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण होत नसल्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत असल्याचे काही दिवसांपूर्वी चंद्राबाबूंनी म्हटले होते. सीआयआयच्या परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. टीडीपीने अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला जास्त महत्व न दिल्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळा आणला होता.

नायडू म्हणाले की, सन २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्य वेगळे करताना आंध्रवर मोठा अन्याय झाला आहे. पण राज्याच्या विकासासाठी मी कठोर मेहनत घेत आहे. जास्तीत जास्त लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 9:35 am

Web Title: cm chandra babu naidu tdp warns bjp to quite nda for insufficient amount to andhra pradesh in budget
Next Stories
1 आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक
2 भारतातील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार अबू रशिद सीरियात ठार
3 अरविंद केजरीवाल भ्रष्ट, उपोषणास बोलावणार नाही: अण्णा हजारे
Just Now!
X