निवडणुक प्रचार काळात जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डींनी गुरूवारी शेतक-यांसाठी एक आनंदाची घोषणा केली आहे. त्यांनी शेतकर-यासाठी ऋतु भरोसा ही नवी योजना जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत शेतक-यांना १२ हजार ५०० रूपयांची मदत दिली जाणार आहे. ही योजना येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

यावेळी त्यांनी आधीच्या चंद्राबाबु नायडू सरकारची अन्नदाता सुखीभव ही योजना बंद केली आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना दहा हजार रूपयांची मदत मिळत होती. गुरूवारी जगनमोहन रेड्डी यांनी कृषि विभागाची आढावा बैठक घेऊन काही महत्वपुर्ण निर्णय घेतले.

याबैठकीत त्यांनी शेतक-यांना त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत मुल्य मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना करणयाच्या अधिका-यांना सुचना केल्या. याशिवाय त्यांनी अर्थसंकल्पात मार्केट स्टॅबलाइझेन फंडासाठी ३ हजार कोटींच्या निधीची देखील घोषणा केली. त्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयांचे सर्वांकडून स्वागत केले जात आहे.