बिहारमध्ये १ एप्रिलपासून देशी दारूवर बंदी लागू होणार असून त्यानंतर देशी दारूच्या भट्टय़ा नष्ट करण्यास मागेपुढे पाहू नये, असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी महिलांना केले.

गरज भासल्यास भट्टी नष्ट करण्यास मागेपुढे पाहू नये आणि त्याबाबत तक्रार करावी, असेही नितीशकुमार म्हणाले. देशी दारूवर बंदी घालण्याच्या प्रचाराची लोकचळवळ व्हावी, असेही ते म्हणाले.

सरकारने घेतलेल्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी पाटण्यात एक खास कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकांची जाहिरात करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.