27 September 2020

News Flash

उत्तर प्रदेश : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठासाठी ५० एकर जमीनीस मंजूरी

लखनऊमधील चक गंजरिया जवळ जागा निश्चित

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सहा महत्वपूर्ण प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे. यामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठासाठी सरकारने लखनऊमधील ५० एकर जमीनीस मंजूरी दिली आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे उत्तर प्रदेश सरकार वैद्यकीय विद्यापीठ उभारणार आहे. यासाठी लखनऊमध्ये जागा निश्चित करण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा आणि सिद्धार्थनात सिंह यांनी या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठ चक गंजरिया जवळील ५० एकर जमीनीवर उभारले जाणार आहे. मंगळवारी यासाठी जमीन हस्तांतरणास  मुख्यमंत्री योगींच्या कॅबिनेट बैठकीत मंजूरी मिळाली. यासाठी २० एकर जमीन आरोग्य विभाग व प्रत्येकी १५ एकर जमीन वैद्यकीय शिक्षण विभाग आणि लखनऊ प्राधिकरण उपलब्ध करून देणार आहे. ही जमीन अगोदर सुपर स्पेशालिटी कॅन्सर रूग्णालयासाठी देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 5:42 pm

Web Title: cm yogi adityanath today approved the proposal to transfer of land to atal bihari vajpayee medical university msr 87
Next Stories
1 रिसॉर्ट बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार काश्मीरमध्ये विकत घेणार जमीन
2 दलित असल्याने महिला आमदाराला गणेश मंडपात प्रवेश नाकारला
3 १५ हजारांच्या दुचाकीसाठी पोलिसांनी ठोठावला २३ हजारांचा दंड
Just Now!
X