News Flash

जिंदाल व बाल्को कंपन्यांच्या खाण निविदा फेटाळल्या

जिंदाल स्टील अँड पॉवर व बाल्को या कंपन्यांनी चार कोळसा खाणींसाठी दाखल केलेल्या निविदा केंद्र सरकारने रद्द केल्या आहेत.

| March 22, 2015 04:24 am

जिंदाल स्टील अँड पॉवर व बाल्को या कंपन्यांनी चार कोळसा खाणींसाठी दाखल केलेल्या निविदा केंद्र सरकारने रद्द केल्या आहेत. कारखानदारांनी यात दबाव गटाचा वापर केल्याची शंका आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. आता या चार कोळसा खाणींबाबतचा अंतिम निर्णय चर्चेअंती घेण्यात येणार आहे. कोळसा मंत्रालय फेटाळून लावलेल्या निविदांबाबतचा अंतिम निर्णय घेईल, त्यासाठी अगोदर चर्चा केली जाईल असे कोळसा व वीज मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
कोळसा मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड व बाल्को या कंपन्यांच्या चार कोळसा खाणींच्या निविदा फेटाळल्या आहेत. त्यांच्याबाबत दबाव गट तयार करून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकत असल्याची शंका होती. आता या कोळसा खाणींचे फेर लिलाव करण्यात येतील की त्या कोल इंडियाला दिल्या जातील याबाबत विचारले असता गोयल यांनी सांगितले की, कोळसा मंत्रालय त्यावर निर्णय घेईल. सरकार नऊ कोळसा खाणींच्या निविदांचे फेरपरीक्षण करीत असून त्यात अलीकडच्या लिलावात भाग घेणारे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड व बाल्को या कंपन्यांचा समावेश होता.
जिंदाल पॉवर यांनी तारा कोळसा क्षेत्र, आयव्ही २, आयव्ही ३ साठी निविदा मंजुरीत यश मिळवले होते. भारत अ‍ॅल्युमिनियम कंपनी म्हणजे बाल्कोने गारे पामा आयव्ही ४ या क्षेत्रासाठी निविदेत यश मिळवले होते. त्याचबरोबर इतर पाच कोळसा क्षेत्रांच्या निविदाही स्वीकारलेल्या नाहीत, असे स्वरूप यांनी सांगितले.
निविदा भरलेल्या काही कंपन्यांनी कंपूशाही निर्माण करून संबंधित खाणीच्या किमती कमी राहण्यासाठी प्रयत्न केले, शेडय़ूल दोनमधील चार खाणी व शेडय़ूल तीनमधील पाच खाणी यांच्या वाटपाची फेरतपासणी करणे गरजेचे आहे असे स्वरूप यांनी सांगितले.
फेरपरीक्षण केल्या जाणाऱ्या कोळसा क्षेत्रात मार्की मांगलीचाही समावेश आहे ते कोळसा क्षेत्र ३ असून बी.एस.इस्पातची निविदा मंजूर झाली आहे. सरकारने असा दावा केला आहे की, यात आम्हाला कंपूशाही किंवा काही गैरप्रकार झाल्याचे वाटत नाही, या निविदा मंजूर करताना ठराविक स्वरूपाचे काही अंदाज आहेत किंवा काय याची तपासणी चालू आहे. त्यात कुणी बाहेरचा (आउटलायर) घुसला आहे की काय हे पाहण्याचा हेतू आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, एकूण ३३ कोळसा खाणींचा लिलाव झाला असून पहिल्या टप्प्यात १९ तर दुसऱ्या टप्प्यात १४ खाणींचा लिलाव झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 4:24 am

Web Title: coal mine auction centre rejects jindal steel balco bids
Next Stories
1 कोणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नाही -सिद्धरामय्या
2 पश्चिम बंगालमधील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची आत्महत्या
3 कॉपीला अटकाव : प्राध्यापकास मारहाण
Just Now!
X