News Flash

कोळसा घोटाळा: काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

कोळसा खाण वाटप गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल आणि माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाकडून(सीबीआय) प्राथमिक माहिती अहवाल(एफआयआर) दाखल करण्यात आला

| June 11, 2013 12:33 pm

कोळसा खाण वाटप गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल आणि माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाकडून(सीबीआय) प्राथमिक माहिती अहवाल(एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज मंगळवार दाखल केलेल्या गुन्ह्यात जिंदाल यांच्या ‘जिंदाल पॉवर अँड स्टील लिमिटेड’सह इतर दोन कंपन्यांचा समावेश आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली, हैदराबाद या शहरांमध्ये पंधरा ठिकाणी कोळसा खाण वाटप गैरव्यवहारप्रकरणी आज छापे टाकले.
‘नलवा स्पॉज’ आणि ‘गगन स्पॉज’ या दोन कंपन्यांशी जिंदाल निगडीत आहेत. या कंपन्या सीबीआयच्या रडावर होत्या. या दोन्ही कंपन्यांना छत्तीसगडयेथे २००६ साली प्रत्येकी एक कोळसा खाणवाटप करण्यात आले होते आणि या खाणींमध्ये खाणकाम जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनी संयुक्त उद्यमाने हाताळते. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2013 12:33 pm

Web Title: coal scam cbi registers fir against congress mp naveen jindal
टॅग : Cbi
Next Stories
1 प्लीज, मला इथून लवकर बाहेर काढ – जामीन मिळाल्यावर श्रीशांतची प्रतिक्रिया
2 नोकरी करणा-या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगचे प्रमाण ७० टक्के अधिक
3 सेग्यू-२ आतापर्यंतची सर्वात लहान दीर्घिका
Just Now!
X