News Flash

कोळसा खाण वाटपप्रकरणी कुमार मंगलम बिर्लांना दिलासा

कोळसा खाण वाटपप्रकरणी उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना दिलासा मिळाला आहे.

| August 29, 2014 05:59 am

कोळसा खाण वाटपप्रकरणी उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेल्या एका खटल्याचा तपास थांबवत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) विशेष न्यायालयाकडे दिला. यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांच्या न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यावेळी क्लोजर रिपोर्टवर निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी सोमवारी काही कागदपत्रेही विशेष न्यायालयात दाखल करण्यात येतील, असेही सीबीआयने म्हटले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये बिर्ला आणि कोळसा खात्याचे माजी सचिव पी. सी. पारख यांच्याविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. हिंदाल्कोला कोळसा खाण नाकारण्याचा निर्णय पारख यांनी काही महिन्यातच बदलला होता. परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसताना किंवा कोणतेही वैध कारण नसताना हा निर्णय घेतल्याचा आरोप पारख यांच्यावर करण्यात आला.
भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली बिर्ला, पारख आणि इतर अधिकाऱयांवर आरोप ठेवण्यात आले होते. तालाबिरा दोन आणि तीन कोळसा खाणींचे २००५ मधील वाटपाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 5:59 am

Web Title: coalgate cbi files closure report in case against k m birla
Next Stories
1 सर्व भारतीय हिंदू असल्याच्या वक्तव्यावर नजमा हेपतुल्ला यांचे घूमजाव
2 महिला न्यायाधीशावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी सध्याच्या चौकशीला स्थगिती
3 सत्तरीनंतर सक्रिय राजकारण सोडवे -द्विवेदींची सूचना
Just Now!
X