13 August 2020

News Flash

कोळसा घोटाळा : राठी स्टीलविरुद्ध न्यायालयाकडून आरोप निश्चिती

कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने मंगळवारी दिल्लीतील राठी स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपनीविरोधात आणि कंपनीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱयांविरोधात आरोप निश्चित केले.

| May 19, 2015 11:57 am

कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने मंगळवारी दिल्लीतील राठी स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड या कंपनीविरोधात आणि कंपनीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱयांविरोधात आरोप निश्चित केले. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी आरोप निश्चितीसंदर्भात मंगळवारी आपला निर्णय दिला.
भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १२० ब आणि ४२० अंतर्गत चारही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. चारही आरोपींनी आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद केला असून, सविस्तर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे, असे निर्णय देताना न्या. पराशर यांनी सांगितले. राठी स्टील अॅण्ड पॉवर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी उदीत राठी, सहायक महाव्यवस्थापक कुशल आगरवाल यांच्यावर सीबीआयने आरोप ठेवले होते. छत्तीसगढमधील केसला नॉर्थ खाण वाटपामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून सीबीआयने यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे आणि फसवणूक असे आरोप या सर्वांवर ठेवण्यात आले आहेत. ते सर्व आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2015 11:57 am

Web Title: coalscam court frames charges against rspl
Next Stories
1 मोदी सरकारचे पहिले वर्ष देशासाठी आपत्तीजनक- येचुरी
2 काबूलमध्ये शक्तिशाली स्फोटात सहा ठार
3 अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वतःचे ट्विटर अकाऊंट
Just Now!
X