22 January 2021

News Flash

“आमचा म्हैसूर पाक खाल्ल्याने करोना बरा होतो”, अशी जाहिरात करणाऱ्या मिठाई दुकानाचा परवाना रद्द

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने केली कारवाई

प्रातिनिधिक फोटो

आमच्या दुकानातील म्हैसूर पाक खाल्यास करोना बरा होतो असा दावा करणाऱ्या मिठाई दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अन्न संरक्षण आणि सुरक्षा काद्याअंतर्गत कलम ५३ आणि कलम ६१ नुसार ही करावाई करण्यात आली आहे.

कोईम्बतूर येथील श्री राम नेल्लाई लाला स्वीट्स असं कारवाई करण्यात आलेल्या मिठाईच्या दुकानाचे नाव आहे. दुकानाचे मालक श्रीराम यांनी आपल्या दुकानातील म्हैसूर पाक हा करोना बरा करु शकतो अशा माहितीची पत्रक वाटली होती. या पत्रकांमध्ये श्रीराम हे या औषधी म्हैसूर पाकचा फॉर्म्युला पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोफतमध्ये सांगण्यास तयार असल्याचेही म्हटलं होतं. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

हा औषधी म्हैसूर पाक करोनाची लागण झालेल्यांना सुरुवातील थोडा कडू लागेल नंतर मात्र रोगप्रतिकारशक्ती वाढल्यानंतर तो गोड लागू लागले असाही दावा या पत्रकात करण्यात आला होता. “आम्ही हा फॉर्म्युला सरकारला मोफत देण्यास तयार आहोत. आम्ही हा फॉर्म्युला मोदींना देऊ. केंद्राने स्थापन केलेल्या एखाद्या समितीबरोबर आम्ही वर्षभरासाठी मोफत काम करण्यास तयार आहोत,” असं श्रीराम यांनी म्हटलं आहे.

ही जाहीरात व्हायरल झाली आणि एफएसएसएआयच्या नजरेत आली. त्यानंतर एफएसएसएआयचे कोईम्बतूरमधील आरोग्य सेवेचे सह निर्देशक आणि सिद्धा जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी श्रीराम यांच्या दुकानाला भेट दिली. या भेटीसंदर्भातील कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना आधीच देण्यात आली होती.

चौकशी आणि तपासानंतर श्रीराम यांचा खाद्य विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे. एफएसएसएआयने त्यांच्या दुकानाला सील केलं आहे. अधिकाऱ्यांनी एक लाख रुपये किंमतीचा १२० किलो म्हैसूर पाक जप्त केला आहे. मात्र अशाप्रकारे करोनाचा वापर करुन जाहिरात करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. जून महिन्यामध्ये जयपूरमध्ये बाबा रामदेव आणि पतांजलीचे आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी एका गोळीमुळे करोना बरा होऊ शकतो असा दावा केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 8:09 am

Web Title: coimbatore sweet shop claims their mysurpa can cure covid 19 license cancelled and owner booked scsg 91
Next Stories
1 कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार
2 “जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहिल”; UNOCT मध्ये पाकिस्तानला चपराक
3 उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांडातील आरोपी विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात
Just Now!
X