MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज देशासाठी जाहीर केलं. त्याचे तपशील निर्मला सीतारामन पत्रकार परिषदेत सांगत आहेत. हे सांगत असतानाच त्यांनी MSME क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे.

आणखी काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

१०० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या आणि मध्यम व्यवसायांना आत्मनिर्भर योजनेतून कर्ज देण्यात येईल

२५ कोटींपर्यंत कर्ज मिळण्याची सोय या योजनेत आहे. या कर्जासाठी गॅरंटीची आवश्यकता भासणार नाही

MSME सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या बदलली

छोटे उद्योग प्रगती करुन मोठे होऊ शकत नव्हते. कारण त्यांना छोटे उद्योग म्हणून मिळणारे फायदे त्यांना उलाढाल वाढल्यावर मिळत नाहीत आणि ते मोठ्या स्पर्धेत टीकू शकत नाहीत. म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची MSME ची व्याख्या बदलली

उत्पादन हा निकष असणार नाही. उलाढाल आणि गुंतवणूक यानुसार सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांची वर्गवारी करण्यात येईल. त्यानुसार त्यांना सेवा उद्योगांनाही हेच नियम लागू होणार. आधीचे निकष बदलून ते आता वाढवण्यात आले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं.

२० लाख कोटींचं पॅकेज करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांशी, विविध तज्ज्ञांशी चर्चा केली अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज हे देशाच्या विकासासाठी जाहीर केलेलं पॅकेज आहे.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं जाहीर केलं. या २० लाख कोटींच्या पॅकेजचे तपशील काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सगळ्या देशाचं या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं. आज उद्या आणि परवा अशा तीन भागांमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहेत.