महाविद्यालयात निघालेल्या १७ वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना मीरतमध्ये घडली. या प्रकरणी संबंधित तरुणीने आणि तिच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
चिंदौरी गावामध्ये राहणारी ही तरुणी कला शाखेमध्ये शिकते. ती महाविद्यालयाकडे निघाली असताना रसना आश्रम परिसरामध्ये चार तरुणांनी तिला बळजबरीने आपल्या गाडीमध्ये बसवले. तेथून चौघांनी तिला एका शेतामध्ये नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर तरुणी रडू लागल्यावर जवळपासच्या काही माणसांनी घटनास्थळी धाव घेतली. आसपासच्या नागरिकांनी बलात्कार करणाऱया चौघांपैकी दोघांना पकडले. दोघे जण तेथून पळून गेले.
प्राथमिक तपासानंतर बलात्कार करणाऱया तरुणांपैकी एक जण संबंधित तरुणीच्या ओळखीचा होता, असे लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.