27 November 2020

News Flash

बाबरी आणि गुजरात दंगलीचा सूड घेऊ; ‘आयसिस’च्या व्हिडिओत ठाण्यातून पळून गेलेल्या तरूणाची धमकी

आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात व मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ, असे फाहदने या व्हिडिओत म्हटले आहे.

ISIS video : सुमारे २२ मिनिटांचा व्हिडिओ अरबी भाषेमध्ये आहे. प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांना यातून इशारा देण्यात आला आहे.

आयसिस या दहशतवादी संघटनेकडून शुक्रवारी २२ मिनिटांची एक ध्वनिचित्रफीत जारी करण्यात आली. या ध्वनिचित्रफीतीमध्ये आयसिसमधील पाच दहशतवाद्यांच्या मुलाखती दाखविण्यात आल्या आहेत. या पाचजणांमध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ठाण्यातून पळून गेलेल्या फाहद तन्वीर शेख याचाही समावेश आहे. फाहद २०१४ मध्ये आयसिसमध्ये सामील होण्यासाठी सिरीयाला पळून गेला होता. मात्र, आता आपण अबू अमर अल-हिंदी असे टोपणनाव धारण केल्याचे फाहदने त्याच्या मुलाखतीत म्हटले आहे. आम्ही परत येऊ. मात्र, त्यावेळी आमच्या हातात तलवार असेल, आम्ही बाबरी मस्जिद आणि काश्मीर, गुजरात व मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेऊ, असे फाहदने या व्हिडिओत म्हटले आहे. याशिवाय, त्याने गेल्यावर्षी बॉम्बहल्ल्यात मारल्या गेलेला त्याचा मित्र शहीम टंकी यालाही श्रद्धांजली वाहिली. फाहद, शहीम आणि आरिब माजिद हे तिघेजण ठाण्यात राहणारे असून २०१४ मध्ये ते आयसिसमध्ये सामील होण्यासाठी घरातून पळून गेले होते. यापैकी आरिब माजिद हा काही दिवसांपूर्वी भारतात परतला असून सध्या ‘एनआयए’कडून त्याची चौकशी सुरू आहे. सुमारे २२ मिनिटांचा व्हिडिओ अरबी भाषेमध्ये आहे. प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांना यातून इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 9:57 am

Web Title: coming to avenge babri kashmir gujarat muzaffarnagar isis video
टॅग Kashmir
Next Stories
1 आता मागणीनुसार वीजजोडणी – गोयल
2 विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री
3 ममतांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण
Just Now!
X