04 December 2020

News Flash

वकिलांसमोर सरन्यायाधीशांची संपत्ती नगण्य! प्रख्यात वकिलांची दिवसाची फी ५० लाख

भारताचे निवृत्त सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि नवनियुक्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची एकूण संपत्ती सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या कमाईच्या तुलनेत अगदी नगण्य आहे.

महाधिवक्ता के.के.वेणूगोपाल यांनी सोमवारी न्यायाधीशांचे वेतन तिप्पट केले पाहिजे अशी मागणी केली. वेणूगोपाल यांनी ही मागणी करताना कदाचित त्यांच्या डोक्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जाहीर केलेल्या संपत्तीचा विचार असावा. भारताचे निवृत्त सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि नवनियुक्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची एकूण संपत्ती सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या कमाईच्या तुलनेत अगदी नगण्य आहे.

सर्वोच्च न्यायालयातील काही प्रख्यात वकिलांची एका दिवसाची कमाई ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि रंजन गोगोई यांची आयुष्यभराची बचत आणि अन्य संपत्तीपेक्षा जास्त आहे. मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी २१ वर्ष कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून काम केले. त्यातली १४ वर्ष त्यांनी उच्च न्यायालयात घालवली. गोगोई २८ फेब्रुवारी २००१ रोजी गुवहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.

२३ एप्रिल २०१२ रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून या दोघांनी बरीच वर्ष काम केले पण त्यांच्या संपत्तीत लक्षणीय अशी वाढ झाली नाही. उलट त्यांच्यासमोर युक्तीवाद करणारे वकिल धनाढय झाले. भारताचे भावी सरन्यायाधीश गोगोई यांच्याकडे स्वत:च्या मालकीचा सोन्याचा एक दागिनाही नाहीय.

त्यांच्या पत्नीकडे लग्नाच्यावेळी आई-वडिल, नातेवाईक आणि मित्र परिवाराने भेट म्हणून दिलेले सोन्याचे दागिने आहेत. दीपक मिश्रा यांच्याकडे सोन्याच्या दोन अंगठया आणि एक सोनसाखळी आहे. त्यांच्या पत्नीकडे गोगोई यांच्या पत्नीपेक्षा थोडे जास्त दागिने आहेत. गोगोई आणि मिश्रा दोघांकडे स्वत:च्या मालकीची गाडी नाहीय. गेली दोन दशक त्यांच्याकडे सरकारी वाहन असल्यामुळे त्यांनी कदाचित गाडी विकत घेतली नसावी.

न्यायाधीश गोगोई यांनी बिलासह कोणतीही देणी थकवलेली नसून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार नाहीय. न्यायाधीश मिश्रा यांनी दिल्लीच्या मयूर विहारमध्ये अॅडव्हकोट को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी बँकेकडून २२.५ लाखांचे कर्ज काढले होते. त्या कर्जाचे हप्ते ते अजूनही चुकवत आहेत. न्यायाधीश गोगोई आणि त्यांच्या पत्नीचा एलआयसी पॉलिसीसह एकूण बँक बॅलन्स ३० लाख रुपये आहे.

गुवहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश बनण्यापूर्वी त्यांनी गुवहाटी बेलटोला येथे एक भूखंड विकत घेतला होता. तो त्यांनी यावर्षी जून महिन्यात ६५ लाखांना विकला. तो भूखंड कोणी विकत घेतला त्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. त्यांच्या आईने गोगोई आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एक भूखंड केला. त्याची माहिती सुद्धा गोगोई यांनी दिली आहे. दोन्ही न्यायाधीशांच्या संपत्तीचा विचार केला तर सर्वोच्च न्यायालयातील काही प्रख्यात वकिल दिवसाला ५० लाख रुपयांची कमाई करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2018 11:08 am

Web Title: compare to supreme court lawyers daily earning cji assets is less
टॅग Supreme Court
Next Stories
1 रंजन गोगोई देशाचे ४६ वे सरन्यायाधीश, जाणून घ्या त्यांची कारकिर्द
2 कोलकात्यात रुग्णालयाला आग, २५० जणांना काढले बाहेर
3 रुपयाचा ऐतिहासिक तळ, डॉलरमागे ७३ ची वेस ओलांडली
Just Now!
X