News Flash

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जातीय हिंसाचाराच्या घटनात वाढ – केंद्रीय गृहराज्यमंत्री

२०१३ च्या तुलनेत २०१५ या घटनांमध्ये घट झाली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले

किरण रिजीजू

देशातील जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये वाढ झाली असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले. मात्र, त्याचवेळी २०१३ च्या तुलनेत २०१५ या घटनांमध्ये घट झाली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरण रिजीजू म्हणाले, २०१४ मध्ये मे महिन्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यावर्षाच्या तुलनेत २०१५ मध्ये जातीय हिंसाचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. मात्र, २०१३ या वर्षाशी तुलना केली असता, चालू वर्षात या घटनांमध्ये घट झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या विषय असून, राज्य सरकारला आवश्यक असलेली सर्व मदत केंद्र सरकारकडून केली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपचे वर्चस्व असलेल्या भागांमध्येच जातीय हिंसाचाराच्या घटना का वाढताहेत, असा प्रश्न मल्लिकार्जून खर्गे यांनी विचारला. बिहार, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमध्ये जातीय हिंसाचाराच्या घटना जास्त आहेत. त्यातुलनेत पश्चिम बंगाल, केरळमध्ये या घटनांचे प्रमाण कमी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. किरण रिजीजू यांनी हा आरोप फेटाळून लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2015 11:47 am

Web Title: comparing last year communal violence incidents increased in this year
टॅग : Kiren Rijiju
Next Stories
1 ‘आयसिसच्या तेल पुरवठ्यासाठीच तुर्कीने आमचे विमान पाडले’
2 आमीरच्या मदतीला शाहरूख आला धावून, देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही
3 माकडाच्या दगडफेकीत पुजाऱयाचा मृत्यू
Just Now!
X