08 August 2020

News Flash

स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत २४ रोजी निकाल

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली

| June 2, 2015 02:30 am

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी खोटी माहिती दिल्याच्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाने निकाल २४ जूनपर्यंत राखून ठेवला आहे.
मन्नन यांनी न्यायालयाला सांगितले की, स्मृती इराणी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे त्यात १९९६ मध्ये दिल्ली विद्यापीठातून बीए झाल्याचे म्हटले होते. ११ जून २०११ रोजी गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवताना त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमचा एक भाग पूर्ण केल्याचे म्हटले होते. हे अभ्यासक्रम त्यांनी दूरशिक्षणातून पूर्ण केल्याचे म्हटले होते. १६ एप्रिल २०१४ रोजी त्यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवताना बी. कॉम भाग १ पूर्ण केल्याचे म्हटले होते. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता समाज जाणून घेऊ इच्छितो. आम आदमी पक्षाच्या अमेठीतील उमेदवाराने व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या वेळी इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 2:30 am

Web Title: complaint against smriti irani court reserves order for june 24
टॅग Smriti Irani
Next Stories
1 जनता परिवार एकत्र न आल्यास काँग्रेस-जदयू युती?
2 जयललिता खटल्याच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
3 काँग्रेसतर्फे आजपासून वर्षभर आंबेडकर जयंती कार्यक्रम
Just Now!
X