News Flash

अकबरूद्दीन ओवेसीविरोधात तक्रार दाखल

विहिंप, बजंरग दलच्या कार्यकर्त्यांनी केली तक्रार

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादेतील सुलतान बाजार पोलीस ठाण्यात एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कार्यकर्त्यांनी अकबरूद्दीन ओवेसींवर हिंदूंविरोधात वक्तव्य करणे आणि मुसलमानांना भडकवण्याचा आरोप केला आहे.

काही दिवसअगोदरच एका गंभीर आजारातून उठलेल्या अकबरुद्दीन ओवेसी यांनी तेलंगणमधील करीमनगर येथे एका सभेदरम्यान जमावाकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या घटनांचा उल्लेख करताना संघ, भाजपासह बजरंग दल व विहिंपबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

यावेळी त्यांनी त्यांचं ‘सिर्फ १५ मिनिट’ वालं विधान देखील पुन्हा केलं होतं. शिवाय, आरएसएसवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असेही ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 4:52 pm

Web Title: complaint filed against akbaruddin owaisi msr 87
Next Stories
1 कारगिल विजय दिवशीच मुख्यमंत्र्यांकडून ‘त्या’ जवानाची दखल, नोकरीत मिळाली बढती
2 … म्हणून येडियुरप्पांनी आपल्या नावाचं स्पेलिंग बदललं
3 प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसह जाहिराती, दुकानांद्वारे रेल्वेची वर्षभरात ३५० कोटींची कमाई
Just Now!
X