देशात करोनाचा संसर्ग सध्या अतिशय वेगाने वाढत आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाउन घोषित केला जात आहे, तर काही ठिकाणी लॉकडाउनचा कालवधी वाढवला जात आहे. हरियाणा सरकारने ३ मे पासून सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन घोषित केला आहे. गृहमंत्री अनिल विज यांनी याबाबत घोषणा केली आहे.

या अगोदर शुक्रवारीच राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये वीकेंड लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. आता संपूर्ण राज्यात सात दिवस कडक लॉकडाउन असणार आहे. हरियाणात सध्या करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढलेला आहे. शनिवारी राज्यात १२५ कोरनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.

National Lockdown : “देशभरात लॉकडाउन लावा”, केंद्रीय कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांची भूमिका!

तर, देशात ३ ते ५ मे दरम्यान करोना रुग्णांची सर्वाधिक वाढ दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारला करोनाबाबत सल्ला देणाऱ्या पथकाच्या प्रमुखांनी दिली होती. त्यापाठोपाठ आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाउन लावण्याची भूमिका मांडली असल्याची माहिती मिळत आहे. संडे एक्स्प्रेसच्या हवाल्यान इंडियन एक्स्प्रेससं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे