लान्स नाइक हणमंतप्पा यांच्यासाठी देशभर सर्वसामान्यांपासून नेत्यांकडूनही प्रार्थना
सियाचेनमध्ये हिमकडे कोसळून त्याखाली सहा दिवस गाडले गेलेले लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून देशभर बुधवारी प्रार्थना सुरू असून त्यांची प्रकृती मात्र अधिकच खालावत असल्याचे लष्कराच्या वतीने जाहीर करण्यात आले. हणमंतप्पा यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
हणमंतप्पा यांच्या मेंदूकडे होणारा प्राणवायूचा पुरवठा खालावला आहे. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे सीटी स्कॅनमधून स्पष्ट होत आहे, त्याचप्रमाणे त्यांची विविध इंद्रिये हळूहळू निकामी होत असल्याचेही आढळले आहे. शक्य तितके सर्व उपचार करूनही त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
हणमंतप्पा हे नेहमीच जोखमीच्या मोहिमांसाठी उत्सुक असत. १३ वर्षांच्या लष्करी सेवेत अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक भागांत त्यांनी जिद्दीने सेवा बजावली आहे. ‘‘३३ वर्षांचा हा जवान उच्च ध्येयाने भारावलेला आणि उत्तम शरीर कमावण्यावर भर देणारा आहे,’’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्मिरात दहशतवाद्यांविरोधी मोहिमांत ते पाच वर्षे आणि ईशान्य भारतातही दोन वर्षे त्यांनी अतिरेक्यांविरोधात झुंज दिली आहे.
सियाचेन हिमनदी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून ते नियुक्त आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये तेथील १९,५०० फूट उंचावरील शिखरावर नियुक्त झालेल्या तुकडीत त्यांचाही समावेश होता. तिथे उणे ४० अंश तापमानाला आणि ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना जवानांना तोंड द्यावे लागते. करूनही त्यांची प्रकृती खालावत चालल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. हणमंतप्पा हे नेहमीच जोखमीच्या मोहिमांसाठी उत्सुक असत. १३ वर्षांच्या लष्करी सेवेत अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक भागांत त्यांनी जिद्दीने सेवा बजावली आहे. ‘‘३३ वर्षांचा हा जवान उच्च ध्येयाने भारावलेला आणि उत्तम शरीर कमावण्यावर भर देणारा आहे,’’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्मिरात दहशतवाद्यांविरोधी मोहिमांत ते पाच वर्षे आणि ईशान्य भारतातही दोन वर्षे त्यांनी अतिरेक्यांविरोधात झुंज दिली आहे. सियाचेन हिमनदी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून ते नियुक्त आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये तेथील १९,५०० फूट उंचावरील शिखरावर नियुक्त झालेल्या तुकडीत त्यांचाही समावेश होता. तिथे उणे ४० अंश तापमानाला आणि ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना जवानांना तोंड द्यावे लागते.
क्षणन् क्षण मोलाचा..
एखादी व्यक्ती हिमप्रपातात गाडली गेल्यानंतर पंधरा मिनिटांत तिला बाहेर काढता आले तर वाचण्याची शक्यता ९२ टक्के असते. त्यापुढील पंधरा मिनिटांनी ही शक्यता ३५ टक्क्य़ांवर येते आणि दोन तास दहा मिनिटांनंतर एखाद्याला हिमढिगाऱ्याखालून बाहेर काढले तर त्याच्या बचावाची शक्यता अवघा एक टक्का असते. ऑस्ट्रियातील जैवसंख्याशास्त्रज्ञ मार्कस फॉक यांच्या संशोधनातून निघालेले हे निष्कर्ष हणमंतप्पा यांनी फोल ठरविले आहेत. त्यातही विशेष गोष्ट अशी की, फॉक यांचे हे निष्कर्ष दहा फूट खोलवर गाडल्या गेलेल्यांवरून काढले होते आणि हणमंतप्पा तब्बल ३० फूट खोलवर गाडले गेले होते.

प्रार्थना आणि संवेदना..
* काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हणमंतप्पा याच्या आईस पत्र लिहिले असून जवानांच्या ऋणातून देशवासी कधीच मुक्त होऊ शकत नाहीत, असे नमूद केले आहे. ‘‘हणमंतप्पा यांच्या शौर्याला सलाम,’’ असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले.
* उत्तर प्रदेशातील पदरिया तुला या गावातील निधी पांडे या गृहिणीने या जवानासाठी आपले मूत्रपिंड देण्याची तयारी दाखवली आहे. आपल्या देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या या जवानासाठी प्रार्थनेपलीकडेही काही केले पाहिजे, या भावनेतून मला हा विचार सुचल्याचे व पतीनेही त्यासाठी पाठिंबा दिल्याचे तिने सांगितले.

शुभ्र काही जीवघेणे..
उटा विद्यापीठातील संशोधकांनुसार बर्फाखाली गाडले गेल्यावर शरीरातील तापमान ताशी ३० अंश सेल्सियसने घटते. मानवी शरीरातील सर्वसाधारण तापमान ३७ अंश सेल्सियस असल्याने ताशी ३० अंश सेल्सियसची घट ही प्राणघातकच असते.