News Flash

रालोआला जिंकून देण्याचा निर्धार

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजयी करण्याचा निर्धार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

| September 15, 2013 04:10 am

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजयी करण्याचा निर्धार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांच्या नावाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली, त्यानंतर शनिवारी त्यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या निवडीनंतर अभिनंदन करणाऱ्या तसेच मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व मित्रपक्षांचे मी आभार मानतो, असे ते म्हणाले.
आगामी निवडणुकीत रालोआला विजयी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, याची खात्री बाळगा. भ्रष्टाचार आणि सतत होणारी महागाई हे देशासमोरचे प्रमुख प्रश्न असून आम्ही त्या विरोधात लढू, तसेच विकास आणि सुराज्य हा आमचा नारा असेल, सर्वाचे आशीर्वाद लाभल्यास सत्ता मिळविणे कठीण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 4:10 am

Web Title: confident of nda winning 2014 polls modi
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 ही तर भाजपची विनाशकाले विपरीत बुद्धी -नितीशकुमार
2 ‘ती’ काँग्रेसची प्रथा नाही – गृहराज्यमंत्री
3 ‘विहिंप’समवेत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर करा रशीद अल्वी यांचे मुलायमसिंगना आव्हान
Just Now!
X