केंद्र शासनाच्या आदेशानुसार करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आज (सोमवार)पासून सुरू झाला आहे. मात्र तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी कोविन(CoWIN) अॅप मध्येच बंद पडू लागल्याने सर्व फज्जा उडाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. कोविन अॅपमध्ये नाव नोंदवण्यासाठी अनेक ज्येष्ठांनी प्रयत्न केला, मात्र अॅप सुरूच झाले नाही. यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचेही पाहायला मिळाले. अनेक रुग्णालयांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार केल्याची देखील माहिती समोर आली आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

परिणामी लसीकरणासाठी सकाळी लवकर आलेल्या अनेकांना अनेक तास ताटकळत बसावे लागले. यामध्ये अगोदर साईटवर नोंदणी केलेले व स्वतः पोर्टलवर नोंदणी केलेल्यांचाही समावेश होता. मूलचंद सारख्या अनेक रुग्णालयांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व आलेल्यांना लस दिली दिली जावी म्हणून १ वाजेपासून रजिस्ट्रेशन बंद केले.
दिल्लीतील मूलचंद रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी मधू हंडा यांनी सांगितले की, अनेकांनी आरोप केला की १२ वाजेपासून लसीकरण सुरू होईल, असं त्यांना सांगण्यात देखील आलं नाही.

लसीकरणासाठी सुधारित अ‍ॅप

आपल्या वडिलांना व सासऱ्यांना लसीकरणासाठी मूलचंद रुग्णालायत घेऊन आलेले गुरुग्राममधील जसविंदरसिंग म्हणाले, दोन तासांपासून आम्ही रांगेत आहोत. माझ्या पालकांचे वय ८० पेक्षा अधिक असल्याने त्यांना रांगेत उभा राहण्यास त्रास होत आहे. इथं कुठलेही व्यवस्थापन नाही.