News Flash

पंतप्रधान मोदी आरामात झोपलेत, मात्र जनता रांगेत उभी आहे: काँग्रेस

सरकारने देशातील जनतेला चुकीची आश्वासने दिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वसामान्यांच्या दुःखाशी काही देणेघेणे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरामात झोपले आहेत आणि देशातील सर्वसामान्य लोक मात्र, लांबलचक रांगांमध्ये ताटकळत उभे आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्लीत काँग्रेसचे नेत कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. केंद्र सरकार मनमानी करत आहे. कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे सिब्बल म्हणाले. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या जीडीपीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे महागाई वाढेल, असा आरोप त्यांनी केला. सरकारने देशातील जनतेला चुकीची आश्वासने दिली आहेत. गरीब लोक दूरवरून येऊन एटीएमबाहेर रांगा लावत आहेत. घरात लग्नसोहळा असलेल्या
कुटुंबीयांना त्रास होत आहे. दररोज साडेचार हजार रुपयांमध्ये लग्नासाठीची खरेदी कशी करणार आहे, असा सवाल करत प्रत्येकजण काळ्या पैशाला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या पक्षाचाही या निर्णयाला विरोध नाही, असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.

यावेळी कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका केली. ५६ इंच छाती असलेल्या मुलाच्या आईला रांगेत उभे राहण्याची गरज नव्हती. वृद्ध महिलेला रांगेत उभे राहावे लागले. या घटनेचे मी समर्थन करू शकत नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की, कडक चहाप्रमाणे नोटबंदीचा निर्णयही कडक आहे. पण या निर्णयाद्वारे सरकार उद्योगपतींचीच मदत करत आहे. त्याचा काळ्या पैशाशी कोणताही संबंध नाही, असा आरोपही त्यांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 6:16 pm

Web Title: cong leader kapil sibbal attack on modi on denomination notes
Next Stories
1 लष्करप्रमुखांकडून नियंत्रण रेषेचा आढावा, सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना
2 नवीन वर्षात दिलासा, २०१७ मध्ये पगार १० टक्क्यांनी वाढणार
3 काळ्या पैशांमुळे भारतीय अर्थव्यवस्था तरली, अखिलेश यादवांनी तोडले ‘तारे’
Just Now!
X