News Flash

निरुपम यांचा माफीनामा काँग्रेसने स्वीकारला

पक्षाच्या मासिकात नेतृत्वाबद्दल प्रसिद्ध झालेले वादग्रस्त लिखाण

संजय निरुपम (संग्रहित छायाचित्र)

‘काँग्रेस दर्शन’ या काँग्रेस पक्षाच्या मासिकात पं. जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वडिलांबाबत प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त लिखाणाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माफी मागितल्याने पक्षाने या वादावर पडदा टाकला आहे. निरुपम हे या मासिकाचे संपादक आहेत. पक्षाच्या मासिकात नेतृत्वाबद्दल प्रसिद्ध झालेले वादग्रस्त लिखाण प्रतिमा मलीन करणारे असून त्याची जबाबदारी निरुपम यांनी स्वीकारली आणि आपला बिनशर्त माफीनामा पक्षाकडे सुपूर्द केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:23 am

Web Title: congress accepts sanjay nirupams apology
टॅग : Sanjay Nirupam
Next Stories
1 गुजरातमधील भूखंड वाटपावरून आरोप-प्रत्यारोप
2 तैवानमध्ये भूकंपात अकरा ठार
3 चांद्रवीर एडगर मिशेल यांचे निधन
Just Now!
X