लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जनता दल युनायटेडची (जेडीएस) आघाडी झाली असून आज (दि.१३) त्यांच्यातील जागा वाटपही पूर्ण झाले. त्यामुळे कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला २० तर जेडीएसच्या वाट्याला ८ जागा आल्या आहेत.


काही दिवसांपूर्वी दिल्लीत माध्यमांशी बोलताना माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वोसर्वा देवैगौडा यांनी म्हटले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात आपल्या पक्षाने १२ जागांचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला होता, मात्र १० जागा लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानंतर, आता अंतिम चर्चेनंतर ८ जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, जर काँग्रेस-जेडीएस आघाडीने कर्नाटकात २० ते २२ जागा जिंकल्या तर पुन्हा एकदा कानडी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होईल, असे कर्नाटकाचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी नुकतेच म्हटले होते.

कर्नाटकात २८ जागांपैकी सध्या १६ जागांवर भाजपाचे खासदार आहेत. तर काँग्रेसचे १० आणि जेडीएसचे २ खासदार आहेत.