23 September 2020

News Flash

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रभारींची यादी जाहीर

काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने विभागांच्या प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये मुकुल वासनिक,अविनाश पांडे, रजनी पाटील,आर.सी. खुंटिया,राजीव सातव यांचा समावेश आहे.

विदर्भ विभागासाठी मुकुल वासनिक, मुंबई विभाग व निवडणुक नियंत्रण कक्षाच्या प्रभारीपदी अविनाश पांडे, पश्चिम व कोकण विभागासाठी रजनी पाटील, उत्तर महाराष्ट्र आर.सी. खुनतिया तर मराठवाडा विभागासाठी राजीव सातव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह मित्रपक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ आणि मित्रपक्ष ३८ जागांवर लढणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 9:45 pm

Web Title: congress announces list of in charge for assembly elections msr 87
Next Stories
1 पश्चिम बंगाल : केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो यांना धक्काबुक्की
2 ‘जन जागरण अभियान’साठी अमित शाह २२ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार
3 ISRO ने चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरबद्दल दिली महत्वाची माहिती
Just Now!
X