30 November 2020

News Flash

“राफेलचं भारतात स्वागत; आज प्रत्येक भारतीयाने हे प्रश्न विचारायला हवेत”

"राफेलचं भारतात स्वागत. हवाई दलाच्या शूर जवानांचं अभिनंदन."

बहुप्रतिक्षित राफेल फायटर विमानं अखेर भारताला मिळाली आहेत. भारतानं ३६ राफेल खरेदी केली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ लढाऊ विमान भारताला मिळाली आहेत. या विमानाच्या आगमनानंतर काँग्रेसनं स्वागत केलं आहे. तसेच हवाई दलाच्या जवानांच अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर देशवासीयांना सरकारला काही प्रश्न विचारण्याचं आवाहनही केलं आहे.

पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग करणार आहेत. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

आणखी वाचा- २२ वर्षांनी हवाई दलाला मिळालेल्या जेटचा असा होता प्रवास

राफेल फायटर विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसनं ट्विट करून स्वागत केलं. “राफेलचं भारतात स्वागत. हवाई दलाच्या शूर जवानांचं अभिनंदन. आज प्रत्येक भारतीयाने हे प्रश्न विचारावेत.

१) ५२६ कोटी रुपयांचं एक राफेल विमान आता १६७० कोटी रुपयात का खरेदी केलं?

२) १२६ राफेल विमानाऐवजी ३६ विमानांची खरेदी का?

३) मेक इन इंडियाऐवजी मेक इन फ्रान्स का?

४) ५ वर्ष विलंब का लावला?

राफेल खरेदी संदर्भात काँग्रेसनं चार प्रश्न उपस्थित केले असून, ते देशातील नागरिकांनी सरकारला विचारावेत, असं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा- १९१९ ला रॉयल एअर फोर्सचा तळ ते २०२० ला ‘राफेल’चं स्वागत… जाणून घ्या अंबाला एअरबेसबद्दल

राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाहीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 2:33 pm

Web Title: congress appeal to people of india to raise questions about rafale deal bmh 90
Next Stories
1 करोनाग्रस्तांसाठी वापरली जाणारी औषधाची एक गोळी ५९ रुपयांना
2 ‘चांगला वारा राहूं दे, ओव्हर अँड आऊट’, राफेलच्या अ‍ॅरो लीडरचा संदेश
3 VIDEO: एअर पॉवर बाहुबली ‘राफेल’चे अखेर भारतामध्ये लँडिंग
Just Now!
X