News Flash

प्रियंका गांधी काँग्रेसचा निवडणुकीतील चेहरा, महासचिवपदी नियुक्ती

प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठी खेळी खेळली असून प्रियंका गांधी यांची पक्षात महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षातील कार्यकर्ते प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात यावे, अशी मागणी करत होते. आता प्रियंका गांधी यांना औपचारिकरित्या पक्षात पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

प्रियंका गांधी या निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नव्हते. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती.  ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षात पद दिले आहे. प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून फेब्रुवारीपासून त्या पदभार स्वीकारतील. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रियंका गांधी वडेरा यांना दिलेली जबाबदारी महत्त्वाची आहे. याचा फायदा फक्त पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत मर्यादित राहणार नाही, याचा फायदा सर्वत्र होईल, असे व्होरा यांनी सांगितले.

प्रियंका गांधींसह ज्योतिरादित्य सिंधिया यांची उत्तर प्रदेश पश्चिममधील महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच के सी वेणुगोपाल यांची पक्षाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ही जोडी अमित शाह- नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यात कितपत यशस्वी होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 12:57 pm

Web Title: congress appoints priyanka gandhi vadra general secretary for uttar pradesh east before loksabha election
Next Stories
1 ‘निवडणूक प्रचारासाठी भाजपाने केली सर्व खासगी विमानं बुक’
2 …म्हणून मी वर्षातील ५ दिवस जंगलात राहायचो – पंतप्रधान मोदी
3 नरोडा पाटिया दंगलप्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून ४ दोषींची जामिनावर मुक्तता
Just Now!
X