03 March 2021

News Flash

काँग्रेसचे वर्तन आणीबाणी काळासारखे

आडमुठेपणाने संसदेचे कामकाज ठप्प करणाऱ्या काँग्रेसमुळे देशाचे सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केला आहे.

| August 14, 2015 04:02 am

आडमुठेपणाने संसदेचे कामकाज ठप्प करणाऱ्या काँग्रेसमुळे देशाचे सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केला आहे.
रालोआ घटक पक्षांच्या बैठकीत काँग्रेसविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर रालोआतील घटक पक्षांनी विजय चौक ते संसद भवन ‘लोकशाही बचाव’ मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. रालोआच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेस पक्ष केवळ एका परिवाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला लोकशाही वाचवायची आहे; परिवार नाही, असे ते म्हणाले. जीएसटीसारख्या आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विधेयकास काँग्रेस विनाकारण विरोध करीत असल्याचे रालोआच्या प्रस्तावात म्हटले आहे. सद्य:स्थितीत काँग्रेस आणीबाणीच्या काळासारखे वागत आहे. स्वत:ची खुर्ची वाचविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधानांनी आणीबाणी लादली, कारण त्यांना देशात लोकशाहीऐवजी स्वत:च्या परिवाराच्या हाती सत्ता पाहिजे होती, असा हल्ला मोदींनी चढविला.
ते म्हणाले, तुमचे लोकशाहीविरोधी आव्हान आम्ही स्वीकारले आहे. अशा काँग्रेसचा विकासविरोधी चेहरा लोकांसमोर आणा. तुम्ही मतदारसंघ सांभाळा मी काँग्रेसचे आव्हान स्वीकारतो.
२५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी काँग्रेसला झोडपून काढत केंद्राने केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 4:02 am

Web Title: congress behaves like emergency say narendra modi
टॅग : Narendra Modi
Next Stories
1 ललित मोदींना पंतप्रधान घाबरतात
2 भारत-पाकिस्तानमध्ये ‘एनएसए’पातळीवर प्रथमच चर्चा होणार
3 अजून शंभर अब्ज वर्षांनी विश्वाचा अंत!
Just Now!
X