News Flash

मोदींच्या मतदारसंघात काँग्रेसचे शिबीर

काँग्रेसकडे युवकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांचे शिबीर भरविण्याचे ठरविले आहे.

| February 24, 2015 12:09 pm

काँग्रेसकडे युवकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांचे शिबीर भरविण्याचे ठरविले आहे. सारनाथ येथे २८ फेब्रुवारीपासून तीन दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये २०० युवकांना पक्षाची घटना, इतिहास आणि राजकारणाचे अन्य पैलू याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात युवकांची उत्साही फळी उभी करणे हा या शिबिराचा हेतू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 12:09 pm

Web Title: congress camp in modi constituency
टॅग : Congress
Next Stories
1 ‘केजरीवालही रिटर्न’; ‘जंतरमंतर’वर अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार
2 धर्मांतरावर बंदी येईपर्यंत ‘घरवापसी’ सुरूच- योगी आदित्यनाथ
3 राहुल गांधींच्या सुटीची वेळ चुकलीच- दिग्विजय सिंग
Just Now!
X