संयुक्त पुरोगामी सरकारच्या काळातील गैरव्यवहारांबाबतचे खटले अंगाशी येत असल्याचे पाहून काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचत आहे, अशी जोरदार टीका भाजपने गुरुवारी केली.
जेटली यांच्यासारख्या नेत्याचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा अन्यांसाठी आदर्श उदाहरण ठरला आहे. अशा व्यक्तीविरोधात काँग्रेस खोटे आरोप करीत आहे, असे भाजपचे माध्यम प्रमुख श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.
काँग्रेसमधील एक गट भ्रष्टांना संरक्षित करण्यासाठी काम करीत होता आणि या गटाच्या सोनिया गांधी या प्रमुख होत्या. ‘नॅशनल हेराल्ड’ आणि ‘एअरटेल मॅक्सिस’सारख्या प्रकरणांमुळे काँग्रेसला पळता भुई थोडी झाली आहे, असे शर्मा म्हणाले.