16 December 2017

News Flash

पंतप्रधान होण्याची राहुलमध्ये क्षमता असण्यावर कॉंग्रेस ठाम – सुशिल कुमार शिंदे

राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता असण्यावर कॉंग्रेस ठाम आहे, मात्र भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण

वडोदरा | Updated: December 10, 2012 2:47 AM

राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता असण्यावर कॉंग्रेस ठाम आहे, मात्र भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण याबबात कोणताही निर्णय झालेला नाही, असं केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आज म्हटले.
शिंदे म्हणाले कि, कॉंग्रेस पंतप्रधान पदासाठी पक्षाचे महासचिव राहुल गांधी यांच्या क्षमतेवर पूर्णपणे ठाम आहे. परंतू आगामी २०१४ च्या निवडणुका लक्षात घेता भाजप आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल यावर निर्णय घेऊ शकलेला नाही, भाजप या पदासाठी लाल कृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करत आहे.
यावेळी शिंदे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला. ते म्हणाले कि, जेव्हा २००३ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी याच पदावर अडून बसले आहेत आणि ते आंध्र प्रदेशचे राज्यपाल झाले आणि नंतर केंद्रीय मंत्री झाले.
यावरून हे स्पष्ट होते कि, मोदी आणखी कोणत्याही पदावर गेले नाहीत आणि राजकारणात काहीच प्रगती केली नाही.
शिंदे यांनी आरोप लावला कि गुजरात ला केंद्राकडून देण्यात आलेल्या वीजेद्वारे गुजरात सरकार शेतक-यांच्या वीजेची मागणी पूर्ण करत नसून ती विकत आहे. तसेच मोदी आपली प्रतिमा तयार करण्यासाठी निवडणूक प्रचारावर मोठा खर्च करत आहेत.
मोदी यांनी राज्यात विकास करणार असल्याची खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच काय कि, विकास झाल्याचा आभास आता गुजरातच्या लोकांना होऊ लागला आहे.

First Published on December 10, 2012 2:47 am

Web Title: congress clear about rahul gandhis capability for pm post sushil kumar shinde